साताऱ्यात खड्ड्यांबाबत आर.पी. आय.आंदोलनानंतर पोलिसांना आली जाग....
अजित जगताप
- Sun 14th Jul 2024 06:10 pm
- बातमी शेयर करा

सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा प्रसार माध्यमातून दहा दिवसांपूर्वी रस्त्यातील जिल्हाभिषेक खड्ड्याबाबत आवाज उठवला होता. रस्त्यावर जलाभिषेक या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली. सलग दहा दिवस कारवाईची वाट पाहून अखेर आर. पी. आय.( ए गट) नेते व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यातच तीव्र आंदोलन केले. त्यानंतरच सातारा पोलिसांना जाग आल्याची चर्चा राष्ट्रीय महामार्ग बॉम्बे रेस्टॉरंट या ठिकाणी सुरू झालेली आहे. प्रसार माध्यमाला अनेकांनी धन्यवाद दिले आहेत. याबाबत माहिती अशी की, सातारा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. या ठिकाणी अपघात होऊन वाहन चालक रस्त्यातच आडवे पडत होते. एवढेच नव्हे तर वाहतुकीस खूप मोठा अडथळा असून सुद्धा याकडे संबंधित विभागाने लक्ष दिले नाही. जनतेच्या हाल अपेक्षा होत असल्याचे माहित असूनही संबंधित अधिकारी व पोलीस यंत्रणेने तातडीने उपाययोजना केली नाही.याबाबत दुर्लक्ष केल्यामुळे म्हणजेच शासकीय कामात कुचराई केली होती. हे सिद्ध झाले. सातारा जिल्हा आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, मदन खंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज तुंबलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडण्यात आल्या. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी मानवता भावनेतून कुठेही वाहनाची अडवणूक केली नाही. यानंतर पोलीस यंत्रणा हजर होऊन घटनास्थळी आली . त्यांनी या आंदोलकांना बाजूला केले पण खड्ड्यांबाबत संबंधित विभागाला जाब विचारण्याचे धारिष्ट दाखवले नाही. याची चांगलीच चर्चा आता रघु लागलेली आहे. सध्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी कार्यकर्ते आंदोलन करतात . सातारा जिल्ह्यात काही अधिकारी निष्क्रिय व शासकीय सेवेत असून सुद्धा काम करत नाहीत. त्यांना जाब विचारायला गेले की शासकीय कामात अडथळा आणण्याचे गुन्हे दाखल करतात. त्याबाबत सर्वच जण तत्परता दाखवतात पण जनतेच्या प्रश्नाबाबत आपल्याला दिलेल्या जबाबदारीतून कामे करत नाही. हेच या खड्ड्याने सिद्ध करून दाखवले आहे. या खड्ड्यात टाकलेल्या कुंड्या पाहून अनेकांनी साताऱ्यातील कारभाराबाबत आरसा दाखवल्याचे म्हटले आहे. सदरच्या आंदोलनासाठी आर.पी.आय. वाहतूक जिल्हा अध्यक्ष राजेश ओव्हाळ, आर.पी.आय. शहराध्यक्ष सिद्धू समिंदर, विजय ओव्हाळ, शहीद शेख, राजू ओव्हाळ, भगवान कदम, किरण ओव्हाळ, नवनाथ तानपुरे ,संतोष नवघरे, अतुल गरुड ,सागर गव्हाळे ,जयवंत कांबळे ,रमाकांत शिंदे, निवास काकडे, रामभाऊ मदाळे, किरण घोरपडे, जावेद मिस्त्री, शिराज मिस्त्री ,तानाजी पवार व वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष अमोल गंगावणे, कुमार ओव्हाळ यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येण्यास धन्यता मानली. या आंदोलकांनी लोकशाही मार्गाने शिस्तीत आंदोलन केल्याबद्दल वाहतूक करणाऱ्या प्रवाशांनी कौतुक केले आहे. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी? असा प्रश्न या परिसरातील व्यापारी , उद्योजक, औद्योगिक वसाहतीमध्ये जाणाऱ्या कष्टकरी कामगारांना पडलेला आहे. -------------------------------------------
सातारा जिल्ह्यातील सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच साताऱ्यातील प्रसार माध्यम सामाजिक भान ठेवतात . रस्त्यावर जलाभिषेक ही बातमी प्रसिद्ध झाली होती. दहा दिवस वाट पाहून अखेर आर पी आय पक्षाने लोकशाही मार्गाने शांतता पूर्वक आंदोलन केले. तेव्हा मात्र पोलीस अधिकारी व इतर यंत्रणा आंदोलकांशी चर्चा करू लागले. यालाच खरी लोकशाही म्हणायची का? असा प्रश्न वाहन चालकांनी उपस्थित केला आहे.
----&-------------------------------- फोटो सातारा बॉम्बे रेस्टॉरंट म्युझिक आरपीआय कार्यकर्त्यांनी आंदोलन केले . चर्चा करताना पोलिस अधिकारी (छाया -अजित जगताप, सातारा)
स्थानिक बातम्या
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Sun 14th Jul 2024 06:10 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Sun 14th Jul 2024 06:10 pm
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Sun 14th Jul 2024 06:10 pm
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Sun 14th Jul 2024 06:10 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Sun 14th Jul 2024 06:10 pm
भरदिवसा गळा चिरला :शिवथरमध्ये महिलेचा निर्घृण खून
- Sun 14th Jul 2024 06:10 pm
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Sun 14th Jul 2024 06:10 pm
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Sun 14th Jul 2024 06:10 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Sun 14th Jul 2024 06:10 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Sun 14th Jul 2024 06:10 pm
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Sun 14th Jul 2024 06:10 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Sun 14th Jul 2024 06:10 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Sun 14th Jul 2024 06:10 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Sun 14th Jul 2024 06:10 pm