पालिका कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचे धमकी

कराडमधील प्रकार; जबरदस्तीने पैसे काढून घेतले

कराड : चाकूचा धाक दाखवून एकाने पालिका कर्मचाऱ्याकडील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. शहरातील बुधवार पेठेतील महात्मा फुलेनगरमध्ये सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पालिका कर्मचारी सुनील चंद्रकांत भोसले यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन गणेश संजय वायदंडे (रा. बुधवार पेठ) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवार पेठेत राहणारे सुनील भोसले पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या मुलगा समर्थ याला गल्लीतीलच गणेश वायदंडे याने सोमवारी दुपारी दमदाटी केली. समर्थने याबाबतची माहिती सुनील यांना दिल्यानंतर त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी ते गणेशच्या घरासमोर गेले. त्यावेळी गणेश याने मी बुधवार पेठेतील भाई आहे. तुला ठार मारेन, असे म्हणत सुनील यांचा गळा आवळला. खिशातील चाकू काढून वार करण्याचा प्रयत्न केला. सुनील खाली पडल्यानंतर त्याने लाकडी दांडक्याने मारहाण करीत जबरदस्तीने त्यांच्या खिशातील एक हजार 100 रुपये काढून घेतले. गणेश वायदंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला