चितेजवळ पडलेल्या लाकडावरील रक्ताच्या डागावरुन खुनाचा तपास दोन आरोपी फलटण पोलिसांच्या ताब्यात
Satara News Team
- Tue 26th Nov 2024 01:20 pm
- बातमी शेयर करा

सातारा : चितेजवळ सापडलेल्या लाकडावरील रक्ताच्या डागावरुन पुणे ग्रामीण पोलिसांनी नुकताच एक खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. इंदापूरमधील मौजे तावशी गावात ही घटना घडली होती. ज्येष्ठ नागरिकाच्या खून प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघे आरोपी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आहेत. हरिभाऊ धुराजी जगताप (वय ७४ रा. गंगाखेड, जि. परभणी) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी दादासाहेब मारुती हरिहर (वय ३० रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) आणि त्याचा मित्र विशाल सदाशिव खिलारे (वय २३ , रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा ) यांना अटक करण्यात आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वालचंदनगर परिसरात तावशी गावातील स्मशानभुमीत एक मृतदेह जळत असून, चितेजवळ पडलेल्या लाकडावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग पडले आहेत, अशी माहिती पोलील पाटलांनी १६ नोव्हेंबर रोजी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे स्मशानभुमीतील लोखंडी जाळीवर पुर्णपणे जळालेली हाडे, तसेच काही अंतरावर रक्त सांडलेले दिसत होते.  चितेजवळ पडलेल्या लाकडावरही रक्ताचे डाग दिसत होते.
सरणावर फक्त काही हाडे उरली होती. यामुळे नेमका प्रकार लक्षात येत नव्हता. मात्र, रक्ताचे डाग ताजे असल्याने हा खूनाचा प्रकार असू शकतो, असा संशय पोलिसांना होता. हे प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथकही तपासात सहभागी झाले. दोन्ही पथकांनी इंदापुर, माळशिरस आणि फलटण तालुक्यात तपास केला. मात्र, काही धागेदोरे हाती लागले नव्हते. पोलिसांना लाकडे एका वखारीमधील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फलटण येथील गुणवरे गावातील एका वखारीत पोलिसांचे पथक पोहोचले. आरोपी दादासाहेब आणि विशाल हे दोघे अंत्यविधीसााठी लाकडे घेऊन गेल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली.
तेव्हा त्यांनी खुनाची कबुली दिली.

पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, कुलदीप संकपाळ, सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे, पोलीस कर्मचारी शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, गणेश काटकर, अजित थोरात, स्वप्नील अहिवळे, अजय घुले, निलेश शिंदे, विक्रमसिंह जाधव, अभिजीत कळसकर यांनी याप्रकरणाचा तपास केला.
#crime
स्थानिक बातम्या
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Tue 26th Nov 2024 01:20 pm
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Tue 26th Nov 2024 01:20 pm
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Tue 26th Nov 2024 01:20 pm
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Tue 26th Nov 2024 01:20 pm
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Tue 26th Nov 2024 01:20 pm
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Tue 26th Nov 2024 01:20 pm
संबंधित बातम्या
-
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Tue 26th Nov 2024 01:20 pm
-
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Tue 26th Nov 2024 01:20 pm
-
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Tue 26th Nov 2024 01:20 pm
-
शाहूपुरी पोलीस ठाणे म्हणजे अवैध धंदेवाल्यांचे माहेरघरच!
- Tue 26th Nov 2024 01:20 pm
-
'ड्राय डे' दिवशी पोलिसांनी खाकीचीच लक्तरे वेशीवर टांगली
- Tue 26th Nov 2024 01:20 pm
-
तीन गुन्हेगार दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार
- Tue 26th Nov 2024 01:20 pm
-
सातार्यात चिमुरडीवर अत्याचार : पोक्सो अंतर्गत शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Tue 26th Nov 2024 01:20 pm
-
संजय शेलार खून प्रकरणात एकूण ५ आरोपी ताब्यात
- Tue 26th Nov 2024 01:20 pm