ग्रामबीजोत्पादन गाव चिंचनेर निंब पर्यटनाचे गाव म्हणून ओळख निर्माण करावी : तहसीलदार गायकवाड
Satara News Team
- Sat 5th Oct 2024 12:00 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : मोजे चिंचनेर निंब ता. सातारा येथे ग्रामस्थांनाच्या वतीने ग्रामबीजोत्पादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होते. या कार्यशाळेला तहसीलदार सातारा श्री. नागेश गायकवाड व कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र बोरगाव, डॉ. महेश बाबर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रास्ताविकात विजय जाधव यांनी ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून या गावात ०४ पिकांचे १० पेक्षा जास्त वाणाचे बीजोत्पादन घेऊन राज्यातील २६ जिल्हे व साधारणपणे इतर ०५ राज्यात दर्जेदार बियाणे पुरवठा करण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले. त्या माध्यमातून गावात इतर राज्यातील शेतकरी भेटी देत असल्याचे नमूद केले. बीजोत्पादन श्री. विनोद डांगे यांनी सांगितले की गावात सेंद्रिय कृषि निविष्ठा मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात व पर्यटनासाठी उपलब्ध भोगोलिक संरचना त्यामध्ये सूर्यास्त ,यमाई मंदिराचे दर्शन जल क्रीडा या बाबत माहिती दिली.अध्यक्षीय मार्गदर्शनात श्री. गायकवाड म्हणाले की एकूणच गावाची भोगोलिक संरचना व ग्रामस्थांनी बीजोत्पादनात व सेंद्रिय शेतीत केलेल योगदान बघता सदर गावची कृषि पर्यटनाचे गाव म्हणून संपूर्ण राज्यात नाव लौकिक व्हावे यासाठी शासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असे मत व्यक्त केलं.
पाहुण्यांचा स्वागत लेझीम पथक, दांडपट्टा पथक व ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले. त्यानंतर प्रदर्शन स्थळी पाहुण्यांनी यांत्रिकीकरण,जैविक निविष्ठा , रेशीम उद्याग, विविध बियाणे, सुपरकेन रोपवाटिका इ. स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. महिला शेतकऱ्यांनी घट स्थापना करून काळ्या आईचे ऋण फेडण्याची संकल्पना मांडली.
मान्यवरांचे हस्ते सूर्यास्त पाइंट वर वृक्षारोपण करण्यात आले.तद्नंतर कृषि सहाय्यक श्री. धनाजी फडते यांनी सोयाबीन बीजोत्पादन प्लॉट ला शिवार फेरी घेऊन सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन श्री. किशोर डांगे यांनी केले व आभार सोनाली यांनी केले. या कार्यशाळेला चिंचनेर परिसरातील शेतकरी व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sat 5th Oct 2024 12:00 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sat 5th Oct 2024 12:00 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 5th Oct 2024 12:00 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sat 5th Oct 2024 12:00 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 5th Oct 2024 12:00 pm
संबंधित बातम्या
-
कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
- Sat 5th Oct 2024 12:00 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Sat 5th Oct 2024 12:00 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Sat 5th Oct 2024 12:00 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 5th Oct 2024 12:00 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Sat 5th Oct 2024 12:00 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sat 5th Oct 2024 12:00 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Sat 5th Oct 2024 12:00 pm












