जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉक्टर युवराज करपे

सातारा : तब्बल दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाला नवीन जिल्हा शल्यचिकित्सक मिळालेला आहे. कोरेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर युवराज करपे यांची सातारा जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदी वर्णी लागली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग संचालनालयाकडून ही नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. डॉक्टर करपे बुधवारी जिल्हा रुग्णालयाची सूत्रे स्वीकारणार असल्याची माहिती आहे.
डॉक्टर करपे हे मूळचे कवठे तालुका वाई येथील असून वैद्यकीय क्षेत्रामध्ये तब्बल 23 वर्ष सक्रिय राहून त्यांनी रुग्णसेवा केली आहे. करपे यांनी शासकीय महाविद्यालय मिरज येथे एमबीबीएस ची डिग्री प्राप्त करून कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयातून एमडी स्त्रीरोग तज्ञ म्हणून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. ऑक्टोबर 2000 मध्ये युवराज करपे शासकीय सेवेत दाखल झाले. सुरुवातीला पिंपोडे येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांनी आपल्या वैद्यकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. सातारा जिल्हा रुग्णालयातही त्यांनी दहा वर्ष स्त्रीरोग तज्ञ म्हणून धडाडीने सेवा बजावली. 2010 मध्ये त्यांची बदली सिंदखेडराजा बुलडाणा येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून ग्रामीण रुग्णालयात झाली होती. तेथेही करपे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यानंतर कोरेगाव येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून ते सक्रिय होते.

तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण हे 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर तब्बल दीड महिने हे पद रिक्त होते व प्रभारी कार्यभार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष सोनवणे यांच्याकडे होता. मंगळवारी सार्वजनिक आरोग्य सेवा संचालनालयाकडून सातारा जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉक्टर युवराज करपे यांची वर्णी लागल्याचे अध्यादेश जाहीर झाले. या अध्यादेशामध्ये तत्काळ कार्यभार स्वीकारण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. डॉक्टर करपे यांनी हे आदेश जाहीर होताच आरोग्य उपसंचालक पुणे यांच्याकडे सेवाकाळाचा रुजू रिपोर्ट दाखल केला. बुधवारी डॉक्टर करपे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. जिल्हा रुग्णालयाला करपे यांच्या रूपाने नव्या दमाचा जिल्हा शल्य चिकित्सक मिळालेला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराला वेगळी उंची देण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी प्राथमिक प्रतिक्रिया डॉक्टर करपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला