उदयनराजे समर्थक पालकमंत्र्यांना भेटायला अन्‌ त्याचवेळेस शिवेंद्रसिंहराजेंची एन्ट्री..

सातारा : खासदार उदयनराजेंचे काही समर्थक पालकमंत्री शंभूराज देसाई यांना भेटायला त्यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी गेले होते. त्याचवेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी आगमन झाले. हा भेटीचा योगायोग असला तरी दोन्ही राजांचे पालकमंत्र्यांकडे असे काय काम आणि तेही एकाच वेळी असा प्रश्न सातारकरांना पडला आहे.

सातारा पालिकेची निवडणुकीच्या निमित्ताने मध्यंतरी साताऱ्यातील दोन्ही राजांमध्ये कलगीतूरा रंगला होता. पण, नंतर असे काही घडलं की हा वाद शांत झाला. तसेच पालिकेची निवडणुकही डिसेंबरनंतरच लागणार असल्याने आता प्रत्येक इच्छुकाने आपापल्या वॉर्डात कामे सुरू केली आहेत.
पण, दोन्ही राजे शांत असल्याने कोणीही काहीही बोलत नाहीत. आज खासदार उदयनराजे भोसले यांचे पालकमंत्र्यांकडे काम होते. ते काम घेऊन त्यांचे समर्थक सुनील काटकर व इतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी गेले होते. त्यांची चर्चा सुरू असतानाच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
त्यामुळे हा भेटीचा योगायोग की अन्य काही याची उत्सुकता निर्माण झाली आहे. पण दोन्ही राजांचे पालकमंत्र्यांकडे असे काय काम असू शकते, ते ही एकाच वेळी असा प्रश्न सातारकरांना पडला आहे. याबाबत उदयनराजेंच्या समर्थकांनी मात्र, हा योगायोग समजावा, असे सांगून टाकले आहे. आता आमदार शिवेंद्रसिंहराजे याविषयी काय सांगणार याची उत्सुकता आहे.बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलण्याची शक्यता आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त