चित्रकार सत्यजित वरेकर यांच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन

तळमावले: सुप्रसिध्द चित्रकार सत्यजीत वरेकर यांच्या चित्राचे प्रदर्शन 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर, 2022 या दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई या ठिकाणी भरवले जाणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कला संचलनालय, महाराष्ट्र राज्य संचालक व जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् चे डीन विश्वनाथ साबळे, ख्यातनाम शिल्पकार श्री उत्तम पचराणे, झी 24 तासचे मुख्य संपादक निलेश खरे, चंद्रजीत यादव, सुरेंद्र जगताप हे उपस्थित होते.
या प्रदर्शनात फुल विकणाऱ्या महिलांचे विविध रंगसंगतीच्या मिलाफातून आकर्षक असे चित्रण करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर मासे विकणाऱ्या महिला व सत्यजीत वरेकरांचे लोकप्रिय ठरलेले नंदी बैल वाल्याचे चित्रण देखील पहायला मिळणार आहे. सत्यजीत वरेकर हे कलाविश्व महाविद्यालय, सांगली येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहतात. विविध पुरस्कारांनी सन्मनित या चित्रकाराचे जहांगीर आर्ट गॅलरीतील हे 4 थे प्रदर्शन आहे.
या प्रदर्शनाचे नावच फ्रगरन्स इमोशनल हारमनी म्हणजेच फुलांच सुगंध भावनिक सुसंवाद असे आहे. फुले ही नेहमीच आपल्या जीवनात प्रसन्नता आणत असतात. ते निसर्गातील सौंदर्याची उत्कट अनुभूती देत असतात. ही विविध रंगातील विविध आकारातील फुले सर्वांनाच आकर्षित करत असतात. अशा या फुलांचे व ते विकणाऱ्या महिलांचे कथन अगदी बारकाईने आपल्या चित्रांच्या माध्यमातून वरेकरांनी केलेले आहे.
या फुले विकणाऱ्या महिला व त्यांचे हावभाव पाहणाऱ्याला मोहित करून टाकतात. काही फुल विक्रेत्या विविधरंगी फुलांच्या टोपल्या घेऊन, तर काही जणी जमिनीवरच फुलांचे ढीग ठेवून ग्राहकांच्या प्रतिक्षेत बसल्या आहेत तर काही उभ्या आहेत. त्यांनी हातात धरलेल्या छत्री व त्यांनी परिधान केलेली वेशभूषा तेथील एकूण परिप्रेक्षाला साजेशी अशी आहे. फुले निवडणाऱ्या, गजरा करणाऱ्या, फुले टोपलीत भरणाऱ्या तर काही फक्त शांतपणे फुलांशी संवाद साधणाऱ्या अशा वेगवेगळया आविर्भावातील महिला त्यांच्या उचित अशा हावभाव व त्यांच्या चेहऱ्यावरून झळकणाऱ्या त्यांच्या भावभावना अतिशय सहजतेने चित्रामध्ये परावर्तित झालेल्या दिसतात.
फुलं विक्रेत्या महिलांबरोबरच कोळी समाजातील मासेविक्रेत्या महिला, नंदीबैल वाला या विषयांवरील समाजातील रूढी परंपरा जिवंत ठेवणारी चित्रं देखील या प्रदर्शनाचे महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहेत. महाराष्ट्रातील विविध संस्कृतींचे दर्शन घडवणारे हे प्रदर्शन निश्चितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.

    

 

 

 

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त