बारावीच्या निकाल घटला! राज्यात तब्बल ९१.२५ टक्के विद्यार्थी यशस्वी
Satara News Team
- Thu 25th May 2023 12:15 pm
- बातमी शेयर करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत १४लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी ९१.२५टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९६.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी९३.३४ टक्के इतकी आहे
राज्य मंडळाच्या या परीक्षेसाठी. १४लाख २८ हजार १९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.९७ टक्क्यांनी घट झाली आहे.
सर्व विभागीय मंडळातून ९३.७३ टक्के (नियमित) विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून ८९.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी ४.५९ टक्क्यांनी जास्त आहे.
सर्व शाखांमधून ३५ हजार ५८३ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६ हजार ४५४ एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ८२.३९ आहे.
निकालाची वैशिष्ट्ये:
- ९३.४३ टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
- एकूण विषय संख्या : १५४
- १०० टक्के निकाल लागलेल्या विषयांची संख्या : २३
शाखानिहाय निकालाची टक्केवारी
शाखा : उत्तीर्णतेची टक्केवारी
विज्ञान : ९६.०९ टक्के
कला : ८४.०५ टक्के
वाणिज्य : ९०.४२ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम : ८९.२५ टक्के
विभागनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी
विभागीय : उत्तीर्णतेची टक्केवारी
पुणे : ९३.३४ टक्के
नागपूर : ९०.३५ टक्के
औरंगाबाद : ९१.८५ टक्के
मुंबई : ८८.१३टक्के
कोल्हापूर : ९३.२८टक्के
अमरावती : ९२.७५टक्के
नाशिक : ९१.६६ टक्के
लातूर : ९०.३७टक्के
कोकण : ९६.०१टक्के
या वेबसाईटवर पाहता येणार निकाल
१. mahresult.nic.in
२. https://hsc.mahresults.org.in
३. http://hscresult.mkcl.org
स्थानिक बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Thu 25th May 2023 12:15 pm
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Thu 25th May 2023 12:15 pm
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Thu 25th May 2023 12:15 pm
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Thu 25th May 2023 12:15 pm
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Thu 25th May 2023 12:15 pm
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Thu 25th May 2023 12:15 pm
संबंधित बातम्या
-
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Thu 25th May 2023 12:15 pm
-
शिवडे फाटा अंधारातच! यात्रेपूर्वी लाईट सुरू न झाल्यास शिवसेनेचा इशारा — आंदोलन अटळ!
- Thu 25th May 2023 12:15 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्राच्या खाकीची चर्चा अन् कौतुकही.
- Thu 25th May 2023 12:15 pm
-
गोविंद मिल्कच्या आयकर तपासणीबाबत महत्वाची माहिती समोर
- Thu 25th May 2023 12:15 pm
-
वडोली निळेश्वर येथील महिला मेळाव्यातून महिला सशक्तिकरण व सबळीकरणाचा नारा
- Thu 25th May 2023 12:15 pm
-
सुरूचि महिला ग्रंथालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा आनंदात संपन्न
- Thu 25th May 2023 12:15 pm
-
राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक
- Thu 25th May 2023 12:15 pm
-
खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
- Thu 25th May 2023 12:15 pm