जनता बँक वाचवली, टिकवली आता वस्तिारावर लक्ष केंद्रीत करणार - विनोद कुलकर्णी

मोठया बँकेची छोटी गोष्ट

जनता सहकारी बँकेने गेल्या 15 वर्षाच्या काळात अशक्यप्राय गोष्टी शक्य करुन दाखवल्या आहेत. अपयशातून यशाकडे, तिमिरातून तेजाकडे आणि केलेली प्रगती टिकवणे हे तीन टप्पे लेखक विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पार केले आहेत. बँकेला आता कोणताही प्रकारचा धोका नाही. आता बँकेने  ताळेबंद हजार कोटींपर्यंत न्यावा. बँकेचा हा सर्व प्रवास विनोद कुलकर्णी यांनी ह्यमोठया बँकेची छोटी गोष्टह्ण या पुस्तकातून शब्दबध्द केला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रासाठी हे पुस्तक ह्यरोल मॉडेलह्ण ठरेल असे गौरवोद्गार बॅकिंग व्यवस्थापन सल्लागर अनंत जोशी यांनी काढले.

मसाप शाहुपुरी शाखा, जनता सहकारी बँक आणि संस्कृती प्रकाशनच्यावतीने आयोजित येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्सच्या कर्मवीर हॉलमध्ये सातारा शहराची अर्थवाहिनी अशी ओळख असलेल्या जनता सहकारी बँकेच्या वाटचालीवर आधारित बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन व भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आणि पुण्याच्या संस्कृती प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ह्यमोठया बँकेची छोटी गोष्टह्ण या पुस्तकाच्या प्रकाशनानिमत्ति ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहत्यिकि किशोर बेडकिहाळ, प्रमुख पाहुणे डॉ. राजेंद्र माने, जल्हिा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, संस्कृती प्रकाशनच्या प्रमुख सौ.सुनिताराजे पवार उपस्थित होत्या.

श्री.जोशी पुढे म्हणाले, कोणतीही बँक टिकवणे हे आव्हान असते त्यासाठी विविध गोष्टी कराव्या लागतात. यावेळी त्यांनी रिझवर्ह बँकेच्या नियमाबद्दल माहिती सांगितली. त्याचप्रमाणे युनायटेड वेस्टर्न बँकेचे विलिनीकरण का झाले याबाबत सांगितले. परिवर्तन आव्हानात्मक आणि प्रदीर्घ काळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी सहनशक्ती, संघर्ष करावा लागतो. साडेचार कोटीचा तोटा भरुन काढून लाभांश देण्याच्या स्थितीत बँक आणणे हे जोखमींच व्यवस्थापन लेखकाच्या नेतृत्वाखाली पार पाडले आहे. बँकिंग क्षेत्राच्या निकषानुसार जनता बँकेचा प्रवास अद्भूत आहे. त्यांनी अशक्यप्राय गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. यापुढील काळात सहकाराची भूमिका महत्वाची राहणार आहे. व्यावसायिक व्यवस्थापन, व्यावसायिक नत्तिीमत्ता, तंत्रज्ञानाला महत्व, विविध योजना, सायबर सुरक्षा, प्रशक्षिण यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. परंपरा आणि आधुनिकता याच मश्रिण सहकारी बँकेत आहे. जनता बँकेने आता संघर्षातील तीन टप्पे पार केले असून बँकेला कोणताही प्रकारचा धोका नाही, फक्त बँकेने ताळेबंद हजार कोटीपर्यंत न्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यशाचे पितृत्व घेणार अनेकजण असतात परंतु अपयशाचे पितृत्व कोणी घेत नाही. लेखकाने सामान्यमधील असामान्य शोधलं तसेच त्यांना दैवाची साथ मिळाली पणे त्याने त्यांचे कर्तृत्व कमी होत नाही. अधष्ठिान, कर्ता, साधन, कर्म, भाग्य असा त्याचा क्रम आहे. लेखकाच्या नेतृत्वामुळे जनता सहकारी बँकेमध्ये 360 डग्रिीमध्ये बदल झाला असून ते ह्यमोठया बँकेची छोटी गोष्टह्ण या पुस्तकाच्या रुपाने आले असून हे पुस्तक सहकार क्षेत्रासाठी रोल मॉडेल ठरेल.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहत्यिकि किशोर बेडकिहाळ यांनी लेखक विनोद कुलकर्णी यांचे हे पुस्तक सभासदांची बखर असे आहे. यावेळी त्यांनी लेखकाचे नेतृत्व संकटातून संधी नर्मिाण करणारे आहे. पुस्तकातून लेखकाचा प्रांजळपणा दिसून येत असून आकसाची कोणतीही भाषा नाही. शेवटपर्यंत उत्सुकता कायम ठेवणारे हे पुस्तक आहे. ग्राहकांना प्रशक्षिण करणारे हे पुस्तक आहे. भारतीय कार्यसंस्कृतीमध्ये प्रत्येकाला व्यक्तीनष्ठिेपेक्षा स्वतःची भूमिका काय आहे हे कळणे आवश्यक आहे. सहकार आणि शक्षिण क्षेत्र हे संरजामशाहीमध्ये अडकले आहे. सहकार क्षेत्र म्हणजे निवडणुकासाठी पैसा मिळवण्याचे अधष्ठिान झाले आहे. व्यक्तीनष्ठिेमुळे सहकार क्षेत्रातील व्यक्ती त्याचे काम विसरत चालला आहे त्यामुळे सहकारामध्ये अपप्रवृत्ती वाढल्याचे दिसते. सहकाराचे लोकशाहीकरण झालेले नाही, ते लवकरात लवकर होणे आवश्यक आहे नाही तर सहकार हा शब्द टिकणार नाही. अंतिम नियंत्रण कुणाचे हा मुद्दा महत्वाचा आहे. व्यक्तीनष्ठिा वाढल्याने सहकार अडचणीत आला आहे. लेखकाने जनता सहकारी बँकेच्या लढय़ात वेळोवेळी योग्य भूमिका घेतली त्यामुळे बँक टिकली. राजकारण सगळीकडे आहे. परंतु कोणत्याही आर्थिक संस्थेची स्वायत्ता टिकवणे हे महत्वाचे आहे. या पुस्तकाचे महत्व वेगळे असून यामुळे बँकेच्या ग्राहकांना सावध राहण्याचा दृष्टीकोन मिळणार आहे. या निमत्तिाने चांगल्या लेखकाचा उदय झाल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी जल्हिा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी, लेखक विनोद कुलकर्णी यांची वाटचाल जवळून पाहिली असून त्यांचा मला अभिमान आहे. हे पुस्तक नाही तर मोठया बँकेतील मोठे गौप्यस्फोट असून ते त्यांनी भिडभाड न बाळगता लिहिले आहेत. लेखकाचा बंडखोर स्वभाव पुस्तकातून उमटला आहे. चुकांचा कबुलीजबाब दिला असून त्यांच्या अनेक नर्णियाचा मी साक्षीदार आहे. हे पुस्तक त्याचं अपत्य असून पत्रकारितेपेक्षा जनता बँक लेखकाला प्रिय आहे. हे पुस्तक लेखकाच्या प्रामाणिकपणाचा कबुलीजबाव आहे. त्यांच्यावर असलेल्या आक्षेपांना दिलेले उत्तर आहे. आजपर्यंत आम्ही सुख दुःखात नेहमी एकत्र राहिलो येथून पुढेही भवष्यिकाळात लेखकाच्या कायम पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी साहत्यिकि डॉ. राजेंद्र माने, संस्कृती प्रकाशनच्या प्रमुख सौ. सुनिताराजे पवार यांनी मनोगत व्यक्त केले. लेखक विनोद कुलकर्णी यांनी पुस्तक लिहण्यिामागील संकल्पना सांगितली. त्याचप्रमाणे संघर्ष करत असताना आलेले अनुभव सांगितले. जनता बँकेचे अस्तत्वि राहिले पाहिजे हा उद्देश होता. या यशामध्ये सगळयांचा वाटा आहे. यामध्ये खोटे काहीही लिहिलेले नाही. प्रतिमा उजळण्यासाठी लिहिलेले नाही. माझी प्रसध्दिी व्हावी हा हेतू नाही. साता-यातील 10 पैकी 9 बँकांचे अस्तत्वि संपले असून केवळ जनता बँक राहिली आहे. आतापर्यंत जनता बँक वाचवण्यात, टिकवण्यात कालावधी गेला आता  बँकेचा वस्तिार करण्याचे ध्येय असून लवकरच या बँकेला राष्ट्रीयकृत बँकांशी स्पर्धाक्षण करणार आहे. या संघर्षाच्या वाटचालीत पत्रकारितेचा मोठा उपयोग झाल्याचेही त्यांनी  सांगितले.

प्रारंभी संयोजकांच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक मसाप शाहुपुरी शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लेखकाच्या जनता सहकारी बँकेच्या संघर्षाच्या वाटचालीत योगदान देणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले तर आभार जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार यांनी मानले.

कार्यक्रमास ज्येष्ठ साहत्यिकि रवींद्र बेडकिहाळ, जनता सहकारी बँकेचे आजी-माजी संचालक, अधिकारी, कर्मचारी, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतष्ठिति मान्यवर, मसाप शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, सदस्य आणि सातारकर मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनता सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी, दि गुजराथी अर्बन क्रेडीट सोसायटीचे अधिकारी, कर्मचारी आणि मसाप, शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी यांनी परश्रिम घेतले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त