पुणे विभागच्या पंचवार्षिक निवडणुकीत गुलाबसिंग कदम यांच्या सभासद सहकार पॅनेलची बाजी..
कोमल वाघ /पवार
- Tue 10th Jan 2023 11:32 am
- बातमी शेयर करा
सातारा ; सातारा, सांगली, सोलापुर,कोल्हापुर, रायगड आणि विद्येचे माहेरघर पुणे एवढे जिल्हे कार्यक्षेत्र असणाऱ्या पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था साताराच्या निवडणुकीत गुलाबसिंग कदम यांच्या नेतृत्वाखालील सभासद सहकार पॅनेलला सभासदांनी अजिंक्य बनविले २१-० एवढया फरकाने लगातार चौथ्या विजयाची सुपर हैटट्रिक पुर्ण केली..
ज्यांना कदम सरांनी निवडून आनले,मानाची पदे दिली अशाच स्वार्थी माणसांनी संस्थेची सर्व सत्ता आपल्या हाती ठेवण्याच्या व हेतूने निवडणूक लावून संस्थेच्या सभासदांवर लाखो रुपयांचा खर्च लादला.. अशा सर्व स्वार्थी मनोवृत्तींना सभासदांनी पुन्हा एकदा घरी बसविण्याचा निर्णय घेतला आणि "गुलाबसिंग कदम यांचा कोणी नाद करायचा नाही." हाच नारा पुन्हा एकदा सिद्ध झाला..
सभासद सहकार पॅनलमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनेचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांचे अनमोल असे सहकार्य लाभले तर ते स्वतःही भरघोस मतांनी निवडून आले त्यांचे बरोबर माजी चेअरमन अनिल गोडसे, दत्तात्रय कोलते,अच्युत माने माजी सचिव पांडुरंग रणवरे तर नव्याने संचालक मंडळामध्ये सातारा तालुक्यातील माणिक जाधव,दीपक केंजळे,श्रीरंग सावंत कोरेगाव मधून मनेष धुमाळ,विक्रमसिंह माने कराड मधून विश्वास पाटील व सौ.सुनीता पवार वाई मधून सौ.अनिता ढेरे जावली महाबळेश्वर मधून आनंद बाबर तर सांगली मधून अरुण सावंत आणि सोलापूर मधून रामचंद्र कोळेकर तर पुणे जिल्ह्यातून अनिल कामठे,सुरेश होले व दिलीप वाडकर या सर्व उमेदवारांनी अनमोल असे यश संपादन केले त्यांच्या प्रचाराची धुरा सातारा मधून स्टार प्रचारक म्हणून माजी चेअरमन श्री यशवंत गायकवाड,सुभाष माने माजी सचिव प्रदीप ढाणे,माजी संचालक रामचंद्र जगताप,शिक्षकेतर संघटनेचे नेते रमेश इंगवले यांनी तर पुणे जिल्ह्यतून माजी चेअरमन एस.पी. जगताप,लक्ष्मण माताळे , गुलाबसिंग कदम सरांचे खंदे समर्थक माजी चेअरमन राजेंद्र बाबर,गुंजवटे सर माजी सचिव कोळवले सर आणि सर्व माजी संचालक सभासद आणि विद्यमान उमेदवारांनी "विजयश्री " खेचून आणली….. आणि पुन्हा एकदा पुणे विभाग म्हणजे फक्त "गुलाबसिंग " हेच सूत्र सिद्ध केले..

गुलाबसिंग कदम सर यांच्या देऊर ता.कोरेगांव या गावी विजयी सभेचे आयोजन केले होते.पहिल्यांदा संपूर्ण देऊर गावातून विजयी उमेदवारांची वाद्यवृंदाच्या साथीने मिरवणूक काढण्यात आली आणि मुधाईदेवीच्या दर्शनानंतर श्रीयुत कदम सरांच्या आणि त्यांच्या मुधाई देवी संस्थेच्या प्रमुख पदाधिका-यांच्या व ग्रामस्थांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा शाल श्रीफळ देवून यशस्वी गौरव करण्यात आला...त्यांच्या बरोबर पुणे विभागचे सर्व माजी पदाधिकारी व संस्था संचालक तसेच सर्व सभासद यांनी विजयश्री खेचून आणली त्यांचाही यथोचित गौरव करण्यात आला..या सर्व सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन संस्थेचे माजी सचिव व मुधाईदेवी विद्यामंदिर देऊरचे शिक्षक व विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री.प्रदीपजी ढाणे यांनी केले...आणि सुंदर अशा स्नेह भोजनाने विजयी सभेची सांगता झाली...

स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Tue 10th Jan 2023 11:32 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Tue 10th Jan 2023 11:32 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Tue 10th Jan 2023 11:32 am
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Tue 10th Jan 2023 11:32 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Tue 10th Jan 2023 11:32 am
संबंधित बातम्या
-
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Tue 10th Jan 2023 11:32 am
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Tue 10th Jan 2023 11:32 am
-
फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित
- Tue 10th Jan 2023 11:32 am
-
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Tue 10th Jan 2023 11:32 am
-
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 10th Jan 2023 11:32 am
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 10th Jan 2023 11:32 am
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 10th Jan 2023 11:32 am
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 10th Jan 2023 11:32 am













