घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस पाठलाग करून अटक ५,६०,०००/- रूपये किंमतीचा ऐवज जप्त
Satara News Team
- Thu 5th Dec 2024 07:26 pm
- बातमी शेयर करा
सातारा : दि.२१/११/२०२४ रोजी गोडोली येथील गौरव रेसीडन्सी या अपार्टमेंटमध्ये दिवसा ढवळ्या एका बंद घराचे कुलूप तोडून एका अज्ञात चोरटयाने घरामध्ये चोरी करून सोन्याचे दागिने चोरी केले होते. सदर झाले चोरीबाबत सातारा शहर पोलीस ठाणेस तक्रार दाखल करण्यात आली होती.
प्राप्त तक्रारी नुसार अज्ञात चोरटयाचा सातारा शहर डी. बी. पथक शोध घेत होते. सदर आरोपी बाबत माहिती घेत असताना तांत्रिक माहितीचे आधारे एका संशयित सराईत आरोपीचे नाव समजून आले. सदरच्या चोरटयावर विविध जिल्हयामध्ये २५-३० गुन्हे दाखल असून तो सराईत चोरटा असल्याने व त्याचा निश्चित राहण्याचा ठावठिकाणा नसल्याने त्याचे शोधासाठी पोलीस विविध ठिकाणाहून माहिती प्राप्त करीत होते. परंतू आरोपीबाबत निश्चीत माहिती मिळून येत नव्हती. सातारा शहर पोलीसांनी सातत्याने सदर आरोपीचा पुणे, कोल्हापूर याठिकाणी पाठपुरावा करून सदरचा आरोपी हा धाराशीव जिल्हयामध्ये त्याचे एका नातेवाईकांकडे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. सातारा शहर डी. बी. पथकाचे एक पथक व स्थानिक पोलीस असे धाराशीव जिल्हयामध्ये दोन दिवसापासून त्याचे मागावार होते. सदरचा चोरटा उमरगा तालुक्यातील एका खेडेगावात तो पहाटेच्या सुमारास मोटारसायकलवरून जात असताना पोलीसांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला परंतू तो मोटारसायकल जागीच सोडून शेतातून पळून जावू लागला. त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडून ताब्यात घेतले.संशयित आरोपी राजकुमार उर्फे राजू ओमकार अप्पा वय ३० वर्षे रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव यास पोलीसांनी अटक करून कोर्टामध्ये हजर केले असता त्याची तीन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली . सदर रिमांडमध्ये त्याने सदरचा गुन्हा केलेची कबूली दिलेली असून .आरोपीस अर्षद सत्तार बागवान वय ३२ वर्षे रा. ५५०, शनिवारपेठ कच्छीस्टार बिल्डींग सातारा जि. सातारा या साथीदाराने गुन्हा करण्यास मदत केलेने व त्याचा गुन्हयामध्ये सहभाग झालेने त्यास अटक करण्यात आलेली आहे. आरोपीकडून गुन्हयातील चोरीस गेलेला ५,६०,०००/- रूपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयाचा तपास पो. उपनिरीक्षक श्री. अनिल जायपत्रे हे करित आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साो, समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, मा. उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. राजीव नवले, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के, मा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. श्याम काळे, स.पो.नि. श्रीमती रूपाली मोरे, श्री. पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल जायपत्रे, श्री. सुधीर मोरे, श्री. अशोक सावंजी पो.हवा. निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, मोहन नाचण, पो.ना. पंकज मोहिते, विक्रम माने, पो. कॉ. इरफान मुलाणी, अमोल निकम, मच्छिंद्रनाथ माने, संतोष घाडगे, सागर गायकवाड, सचिन रिटे, विशाल धुमाळ, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी केलेली आहे.
आरोपी खालील
१] राजकुमार उर्फे राजू ओमकार अप्पा वय ३० वर्षे रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव
२] अर्षद सत्तार बागवान वय ३२ वर्षे रा. ५५०, शनिवारपेठ कच्छीस्टार बिल्डींग सातारा जि. सातारा
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 5th Dec 2024 07:26 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 5th Dec 2024 07:26 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 5th Dec 2024 07:26 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 5th Dec 2024 07:26 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 5th Dec 2024 07:26 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Thu 5th Dec 2024 07:26 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Thu 5th Dec 2024 07:26 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Thu 5th Dec 2024 07:26 pm
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Thu 5th Dec 2024 07:26 pm
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Thu 5th Dec 2024 07:26 pm
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Thu 5th Dec 2024 07:26 pm
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Thu 5th Dec 2024 07:26 pm
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Thu 5th Dec 2024 07:26 pm













