हेमंत काटकर मित्र समूहातर्फे एहासास बालगृहाला धान्याचे वितरण

नागठाणे- भरतगाववाडी (ता.सातारा) येथील श्री गजानन भंडारा कार्यक्रमाचे लिलावतील शिल्लक धान्य वळसे येथील एहसास मतीमंद  बालगृह या शाळेत मोफत वितरीत करण्यात आले.  
       रविवारी सकाळी भरतगाववाडी येथे शिल्लक धान्याचा लिलाव करण्यात आला.यावेळी गावातील हेमंत काटकर मित्र समूहाच्या वतीने शिल्लक धान्य विकत घेऊन ते सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनील काटकर यांचे मार्गदर्शनाखाली वळसे येथील एहसास मतीमंद मुलांचे बालगृह येथे मोफत वितरीत करण्यात आले. 
     यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांनी एहसास मतीमंद  शाळेसाठी वेळोवेळी शक्य होईल तशा स्वरूपात मदत करू अशी ग्वाही दिली.  नव उद्योजक तेजस जगताप, हेमंत काटकर मित्र समूहाचे हेमंत काटकर, दिलीप पडवळ, प्रभाकर कणसे, निखिल मोहिते आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शाळेचे कार्याध्यक्ष संजय कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

 वळसे- एहसास मतिमंद शाळेस धान्य देताना माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती सुनील काटकर ,तेजस जगताप

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त