पावसानंतरही पोलीस भरतीला सुरवात ! जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे मायक्रो प्लॅनिंग

सातारा  : राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती प्रकिया सुरू झाली.सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 235 पदांसाठी 19 जूनपासून भरती प्रक्रिया चालू करण्यात आली होती. ऐन पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी घेतली जात असल्यावरून टीका झाली होती अनेक जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी घेण्यात आली. काही ठिकाणी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या. सातारला पण पाऊस झाला परंतु सातारा जिल्हा पोलीस दलाने पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली नीटनेटके नियोजन केल्याने. आलेल्या पावसाचा व्यत्यय जाणवला नाही.भरती प्रक्रियेमध्ये सातारा पोलिसांनी उमेदवारांचे रेटीना स्कॅन बायोमेट्रिक स्कॅन घेण्यात आले असून सर्व शारीरिक नोंदणी या ऑनलाइन घेतल्या जात आहेत.भरती प्रक्रियेतील गैरप्रकार टाळणे आणि पारदर्शकता ठेवणे यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला.सीसीटीव्ही कॅमेरा आणि इन कॅमेरा याची रेकॉर्डिंग केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या पोलीस भरतीचे मायक्रो प्लॅनिंग केले. यामुळे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी आनंद व्यक्त केला आहे.


सातारा पोलीस दलात दाखल होण्यासाठी इच्छुकांची मांदियाळी..

राज्यात एकाच वेळी पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सातारा जिल्हा पोलीस दलासाठी सन 2022-2023 करीता 184 पोलीस शिपाई, 12 बँडसमन, व 39 चालक अशा एकुण 235 पोलीस शिपाई या पदाच्या भरती प्रक्रियेसाठी इच्छुकांचे एकुण 13030 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. तर प्रत्यक्ष मैदानी चाचणीकरीता 7483 उमेदवार उपस्थित होते..

पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे मायक्रो प्लॅनिंग,! पोलिस भरतीत  घोटाळा व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी "रेडीओ फ्रीक्वेन्सी" तंत्राचा वापर...

पोलीस भरती प्रक्रीयेमध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी आरएफआयडी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी परिक्षा ही पारदर्शक आणि अचुक निर्णय घेण्यासाठी मदत झाली, भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी याकरीता ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे नातेवाईक उमेदवार म्हणून भरती प्रक्रियेत नव्हते अशाच पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा बंदोबस्त कर्तव्याकामी उपयोग करण्यात आला.मैदानी चाचणी सुरळीत पार पडावी याकरीता स्वतंत्र रंगाचे कर्तव्य पास पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देण्यात आले यामुळे भरती प्रक्रिया सुलभतेने पार पडण्यात मदत झाली.भरती प्रक्रीया ही तटस्थपणे, निःपक्षपातीपणे आणि पारदर्शक पार पाडण्यासाठी भरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार आणि भ्रष्टाचार होणार नाही याकरीता योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली होती पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांकडून ओळखी संदर्भात किंवा अन्य प्रकाराचे आमिष दाखवून आर्थिक देवाण घेवाणीचे गैरव्यवहार करुन फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही,याकरीता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांना पत्रव्यवहार करुन त्यांचे पथक संपूर्ण भरती प्रक्रिया कालावधीत उपलब्ध करण्यात आलेले होते.मैदानी चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी मोबाईल वा अन्य इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस मैदानावर आणू नये, अशी ताकिद पोलिसांकडूनच देण्यात आलेली आहे. असे आढळून आल्यास संबंधित उमेदवारांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा विशेष शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे साध्या वेशातील पथक तयार करुन त्याद्वारे मैदान व आसपासचे परिसरामध्ये फिरते राहुन सर्व हालचालीवर व्हिडिओ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बारकाईने लक्ष ठेवण्यात आलेले होते. भरतीच्या मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे व व्हिडिओ शुटिंग द्वारे पारदर्शकपणे ही मैदानी चाचणीची प्रक्रिया पार पडावी म्हणून यासाठी पोलीस प्रशासनाकडून पूर्णतः काळजी घेण्यात आली 


सातारा पोलीस भरती उमेदवारांकरीता मैदानी चाचणीसाठी उपयुक्त सोयी सुविधा.. 

मैदानी चाचणीच्या वेळी छाती, उंची, मोजमाप, गोळाफेक, 1600 मीटर तसेच 800 व 100 मीटर उमेदवारांनी कशा प्रकारे पुर्ण करायचे आहे याचे प्रात्यक्षिक देण्यात आले..

सातारा जिल्हा पोलीस दलाने काही पण झाले तरी पोलीस भरती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जणू काही वसाच घेतला होता 

पावसाळी वातावरण लक्षात घेता 1600 मीटर तसेच 800 व 100 मीटर या चाचणीकरीता पोलीस परेड ग्राऊंड (हजेरीमाळ) उपलब्ध न झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणुन सोनगांव ते शेंद्रे हा रस्ता चाचणीकरीता उपलब्ध करण्यात आलेला होता.सर्वच मैदानी चाचणीकरीता उपलब्ध व्हावे म्हणून संबधित ठिकाणी ग्रिट व लाकडी भुस्सा याचा योग्य प्रमाणात वापर केल्याने. मैदानी चाचणी पावसाळी वातावरणात घेतांना देखील अडचणी आल्या नाहीत. पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना पोलीस दलाकडून राहण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली यामुळे उमेदवार चाचणी देताना फ्रेश होते हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. याच सोबत मैदानी चाचणी करता उपस्थित राहणा-या उमेदवारांना केळी, बिस्कीट, पाणी इत्यादीची सोय पोलीस कॅन्टीनमार्फत सवलतीच्या दरात उपलब्ध केल्याने त्यासाठी इतर ठिकाणी जाण्याची वेळ उमेदवारांवर आली नाही व पैशाची देखील बचत झाली पोलीस भरती प्रकियेदरम्यान पोलीस परेड ग्राऊंड परिसरात वाहतुकीची समस्या निर्माण होवू नये याकरीता वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आलेला होता याशिवाय वाहतुक नियंत्रण पोलीस व बॅरेकेड्सचा योग्य प्रकारे वापर करण्यात आलेला होता.


पोलीस भरती बंदोबस्त यशस्वी करण्यासाठी तगडा बंदोबस्त... 

संपूर्ण परीक्षा भरती प्रक्रिया सीसीटीव्ही निगरानीत होत आहे.भरती प्रक्रिया राबविण्याच्या अभियानात पोलीस अधीक्षक, एक अपर पोलीस अधीक्षक,दोन पोलीस उपअधीक्षक, पाच पोलीस निरीक्षक, सपोनि व  पीएसआय एकूण 34 तसेच 316 कर्मचारी,व्हीडीओ ग्राफर 26, लिपीक 41 व शिपाई 2 यांचा समावेश आहे पोलीस भरतीची मैदानी चाचणी ही सुमारे पहाटे 5 ते रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याने बंदोबस्तावरील अधिकारी व अंमलदार हे सदैव सतर्क व ताजेतवाणे राहतील याकरीता त्यांच्याकरीता मुलभूत सुविधा म्हणून पिण्याचे पाणी, नाष्टा व दुपारचे जेवण व गरजेनुसार रात्रीचे जेवण अशी सोय करण्यात आली होती..

पोलीस भरती बंदोबस्ताला असणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांना मनापासून सलाम...

 

 

सातारा पोलीस भरती उमेदवारांकरीता मैदानी चाचणीसाठी उपयुक्त सोयी सुविधा उपलब्ध केल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणजे सर्व शंका प्रश्नांचे जाग्यावर निरसन. उमेदवाराच्या अडचणीचे निरसन हे पोलीस अधीक्षकांनी स्वतः वेळोवेळी केल्याने उमेदवार हे आनंदी होते.भरती प्रक्रियेत पोलीस प्रशासनाला एक वेळ त्रास झाला तरी चालेल पण उमेदवारांना कोणताच त्रास होणार नाही याची दक्षता सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतल्याने शिस्तप्रिय व पारदर्शक नियोजन तसेच उमेदवारांसाठी दिलेल्या सुविधामुळे भरती प्रक्रिया आदर्शवत वाटली हे नक्की सातारा पोलीसांच्या कर्तव्याला सलाम.!!

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त