प्रत्यक्षामध्ये जे मारेकरी होते ते मोकाट.... हमीद दाभोलकर
Satara News Team
- Fri 10th May 2024 12:56 pm
- बातमी शेयर करा
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात पुणे येथील सीबीआय विशेष न्यायालयाने निकाल सुनावला. त्यात पाच पैकी तिघांची निर्दोष सुटका करण्यात आली तर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना कोर्टाने दोषी ठरवले. याप्रकरणात हमीद दाभोलकरांची प्रतिक्रिया आली आहे. कोर्टाच्या निकालावर समाधान व्यक्त करतानाच त्यांनी ही लढाई संपलेली नसल्याचे स्पष्ट केले.
न्यायालयाच्या निकालाचा आम्ही स्वागत करतो. न्यायव्यवस्थेवरती डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर आम्ही सातत्याने विश्वास ठेवत आलेलो होतो. इथल्या कायदा सुव्यवस्थेवरती विश्वास ठेवला. आणि आज त्या प्रकरणांमध्ये दोन जणांना प्रत्यक्ष जे संशयित मारेकरी होती त्यांना शिक्षा झालेली आहे. एका पातळीवर हा न्याय झालेला आहे. उरलेले जे तीन आरोपी सुटलेले आहेत, त्यांच्याविरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई आम्ही घेऊन जाऊ, असे हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केले.
प्रत्यक्षामध्ये माणसाला मारून त्याचा विचार संपवता येत नाही आणि अशा पद्धतीने डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर त्यांचं काम संपलेलं नाही. उलट निर्धाराने हे काम चालू राहिलेले हे अधोरेखित होतं. ज्या ज्या विचारधारांकडे याच्याविषयी संशयाची सोयी होती दोन जणांना शिक्षा झाली आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया हमीद दाभोलकर यांनी दिली.
सूत्रधार मोकाट
प्रत्यक्षामध्ये जे मारेकरी होते त्यांना शिक्षा झालेली आहे. पण यामागे जे कटामध्ये सूत्रधार होते त्याचे आणि त्यातला मुळातला जो सूत्रधार आहे त्याला मात्र अटक झालेली नाही आणि जे बाकीचे सूत्रधार आहे त्यांची सुटका झालेली आहे. त्यांच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही जाऊ,असा निर्धार त्यांनी या निकालानंतर व्यक्त केला.
काय दिला निकाल
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणत पुणे सीबीआय विशेष न्यायालयाने पाच आरोपींपैकी तिघांची निर्दोष मुक्तता केली. तर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवले. सीबीआय कोर्टाने प्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे, अँड. संजीव पन्हाळेकर आणि विक्रम भावे यांची मुक्तता केली. 11 वर्षानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातील खटल्याचा निकाल आला आहे.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Fri 10th May 2024 12:56 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Fri 10th May 2024 12:56 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 10th May 2024 12:56 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 10th May 2024 12:56 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Fri 10th May 2024 12:56 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 10th May 2024 12:56 pm
संबंधित बातम्या
-
कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
- Fri 10th May 2024 12:56 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Fri 10th May 2024 12:56 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Fri 10th May 2024 12:56 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Fri 10th May 2024 12:56 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 10th May 2024 12:56 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Fri 10th May 2024 12:56 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Fri 10th May 2024 12:56 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Fri 10th May 2024 12:56 pm












