संघर्षयोद्धाच्या टीमचे लिंबमध्ये जोरदार स्वागत

संघर्षयोद्धाच्या टीमचे लिंबमध्ये जोरदार स्वागत

लिंब :  मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे-पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या २१ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे करण्यात आला होता आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करण्यात आली आहे. त्याअतंर्गत चित्रपटाच्या टीमने लिंब गावामध्ये गुरुवारी भेट दिली.

याप्रसंगी लिंबचे माजी पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सदाशिव बागल, संदीप सोनमळे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे कार्यकर्ता उपस्थित होते. शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे.

सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल पचपिंड, जान्हवी तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलताडे पाटील, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ. सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. यावेळी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे, अभिनेता रोहन पाटील, निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाबद्दल माहिती सांगितली. चित्रपटाच्या टीज़रला आणि चित्रपटाची गाणी सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळवत आहेत.

या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिध्देश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला