बेल एअर रुग्णालयामध्ये बांधकाम सुरू असताना भिलार येथील युवकाचा छतावरून कोसळून मृत्यू

महाबळेश्वर : येथील बेल एअर संचालित ग्रामीण रुग्णालयामध्ये बांधकाम सुरु असताना छतावरून कोसळून भिलार येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत महाबळेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की महाबळेश्वर बेल एअर संचालित ग्रामीण रुग्णालयामध्ये बांधकाम सुरु असताना छतावरून कोसळून
जितेंद्र मारुती भिलारे (वय ४५ वर्षे ) रा.भिलार ता महाबळेश्वर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर सागर सुभाष शिंदे यांनी पोलिसांना दिली. मृत कामगाराच्या नातेवाईकांना या अपघाताची माहिती देण्यात आली
ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून याबाबतचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदर संतोष शेलार करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त