राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार कराड दौऱ्यावर पराभवच खापर कोणावर फोडणार ?
- Satara News Team
- Sun 24th Nov 2024 10:39 am
- बातमी शेयर करा
कराड : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडासाफ केला. या निकालानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार आज कराड येथे मुक्कामी येत आहेत.
या दौऱ्यावेळी ते निकालाबाबत पराभवच खापर कोणावर फोडणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. तर विद्यमान चार आमदारांना पराभवास सामोरे जावे लागले. त्यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, फलटणचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार दीपक चव्हाण, कोरेगावचे शशिकांत शिंदे आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांना पराभवास सामोरे जावे लागले.या हा पराभवास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जिव्हारी लागला आहे.
सातारा जिल्ह्यात काल लागलेल्या धक्कादायक निकालानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे कराड दौऱ्यावर मुक्कामी येत आहे. सायंकाळी ते हेलिकॉप्टरने येथील विमानतळावर येतील. तेथून ते एका हॉटेलवर मुक्कामी थांबणार आहेत. तेथे जिल्ह्यातील विधानसभा निकालाचा आढावा घेण्याची शक्यता आहे.
उद्या सोमवारी (दि. 25) सकाळी आठ वाजता जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त ते त्यांच्या कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी रवाना होतील. समाधीस अभिवादन करुन ते तेथील संगीत कार्यक्रमास भेट देवुन वेणुताई चव्हाण सभागृहाकडे रवाना होतील. तेथे यशवंतराव चव्हाण ट्रस्टच्या बैठकीस ते उपस्थित राहतील. तेथुन ते येथील विमानतळावरुन हेलीकॉप्टरने मुंबईकडे रवाना होणार आहेत.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्ह्यातून कोणाला लाल दिव्याची गाडी मिळणार ?
- Sun 24th Nov 2024 10:39 am
शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप विजयकुमार भुजबळ यांची निवड..
- Sun 24th Nov 2024 10:39 am
मारहाण प्रकारात 20 जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- Sun 24th Nov 2024 10:39 am
देशी बनावटीचे 4 पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले,
- Sun 24th Nov 2024 10:39 am
संबंधित बातम्या
-
सातारा जिल्ह्यातून कोणाला लाल दिव्याची गाडी मिळणार ?
- Sun 24th Nov 2024 10:39 am
-
माळशिरस तालुक्यातील मारकर वाडी येथिल बॅलेट पेपरचीनिवडणूक प्रशासनाने रोखली.
- Sun 24th Nov 2024 10:39 am
-
कोरेगावातील १८ ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी करता शशिकांत शिंदेंनी भरले 8.5 लाख रुपये
- Sun 24th Nov 2024 10:39 am
-
विधानसभा निवडणुक प्रक्रियेची चौकशी व्हावी
- Sun 24th Nov 2024 10:39 am
-
आगामी काळात गोरे बंधू दिसणार विधान भवनात?
- Sun 24th Nov 2024 10:39 am
-
मनोजदादा तुम्ही तर जाईंट किलर
- Sun 24th Nov 2024 10:39 am