कास परिसरात मुसळधार पाऊस. त्यामुळेच शहराला पाणीपुरवठा गढुळ

नागरिकांनी पाणी उकळून प्यावे
सातारा शहराला गढुळ पाणीपुरवठा होत आसल्याने नागरिकांनी पाणी उकळून गाळुन प्याव्ये असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे

सातारा : कास तलाव परिसरात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, या पावसामुळे तलावाचे पाणी मोठ्या प्रमाणात ढवळले आहे. परिणामी शहराला गढूळ पाणीपुरवठा होत असून, नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून कास परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तलावाच्या पाणी साठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. कास तलावाच्या उंची वाढीचे काम जलसंपदा विभागाकडून नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. तीन ते चार महिने चाललेल्या या कामामुळे मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन झाले. पावसामुळे लाल माती तलावात वाहून गेल्याने पाणी ढवळून निघाले असून, पाण्याचा रंगही बदलला आहे. सध्या नागरिकांना माती मिश्रित गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्यातील गाळ कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जकातवाडी व सांबरवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात दर दोन तासांनी पाण्याची तपासणी केली जात आहे. पाणी कितपत गढूळ आहे हे पाहून त्या प्रमाणात तुरटी व चुना टाकला जात आहे. नागरिकांनी देखील पुढील काही दिवस पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला