आशियाई कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत सातारची सुवर्णकन्या प्रिशा शेट्टी हिस कास्यपदक
Satara News Team
- Thu 14th Sep 2023 11:05 am
- बातमी शेयर करा
कराड : पश्चिम आशियातील लेबेनॉन देशातील बैरूत या शहरात चार ते नऊ सप्टेंबर या दरम्यान आशियाई कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याची सुवर्णकन्या हिला कांस्यपदक प्राप्त झाले. महाराष्ट्राला कॅडेट गटात प्रिशा शेट्टी ही आंतरराष्ट्रीय पदक मिळवून देणारी पहिली खेळाडू ठरली आहे. इयत्ता नववी मध्ये शिकणारी प्रिशा शेट्टी हिने सात वर्ष काटेकोरपणे अथक परिश्रम करून हे उज्वल यश प्राप्त केले आहे.
या याच्यामध्ये मोठे योगदान आहे प्रशिक्षक म्हणून तिला लाभलेले अक्षय खेतमर सर व नंदिनी खेतमर मॅडम यांचे . मुंबई विमानतळावरून विविध ठिकाणच्या शुभेच्छा स्वीकारत दुपारी दोनच्या दरम्यान तीच वाई येथील जोशी वीर मध्ये आगमन झाले .
येथे तिचे स्वागत ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो मार्शल आर्ट अकॅडमी महाराष्ट्र चे संस्थापक/अध्यक्ष विशाल आबासाहेब कुमठे,कामगार विकास बहुउद्देशीय सामजिक संस्था महाराष्ट्र
बाळासाहेब हिरामण लगस (संस्थापक अध्यक्ष), राकेश लगस ( उपाध्यक्ष)
, स्वातीताई भोसले ( सचिव), प्राथमिक शिक्षिका अर्चना थोरवे, प्रियंका कचरे या मान्यवरांनी स्वागत केले. यावेळेस तायक्वांदो खेळाच्या वाई तालुक्यातील खेळाडू तनिष्का किरवे, वैष्णवी भोसले, मंजुषा गायकवाड, वैभवी भोसले, तनिष्का थोरवे, स्नेहल कचरे, आरोही भोसले, अनवित जगताप, नयन जगताप, रियांश खोपडे उपस्थित होत्या. जिद्द, चिकाटी, मेहनत, कठोर परिश्रमातील सातत्य, व प्रशिक्षकांची मिळालेले मौलिक मार्गदर्शन व कुटुंबीयांची साथ यामुळेच हे खूप मोठे यश मिळालं असे यावेळी प्रिशा शेट्टी हिने आवर्जून सांगितले. तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Thu 14th Sep 2023 11:05 am
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Thu 14th Sep 2023 11:05 am
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Thu 14th Sep 2023 11:05 am
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Thu 14th Sep 2023 11:05 am
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Thu 14th Sep 2023 11:05 am
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Thu 14th Sep 2023 11:05 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 14th Sep 2023 11:05 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 14th Sep 2023 11:05 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 14th Sep 2023 11:05 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 14th Sep 2023 11:05 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 14th Sep 2023 11:05 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 14th Sep 2023 11:05 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 14th Sep 2023 11:05 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 14th Sep 2023 11:05 am













