महामार्गावरील बदेवाडी (भुईंज) उड्डाणपूला जवळ साठणारे पाणी अपघाताला देत आहे आमंत्रण,यामुळे भुईंज प्रेस क्लब आक्रमक ,

भुईंज : महामार्गावरील साठलेल्या पाण्या मुळे एकाच रात्री एकाच वेळी अनेक अपघात सुदैवाने जीवितहानी नाही संतप्त भुईंज व बदेवाडी ग्रामस्थांनी दिला महामार्ग व जिल्हा प्रशासन चे विरोधात आंदोलनाचा इशारा ,उपसरपंच शुभम पवार यांनी व प्रेस क्लबचे वतीने महेंद्र आबा जाधव यांची टोकाची भूमिका,
    गेली तीन दिवसांत झालेल्या संततधार पाऊसामुळे महामार्गावर ठिकठिकाणी निकृष्ठ दर्जाचे काम जनतेपुढे येत आहे तर काही ठिकाणी ठेकेदाराला पूर्वसूचना देऊनही प्रतींबधात्मक उपाययोजना केल्या नाहीत अश्यापैकीच बदेवाडी येथील उड्डाणपुला जवळ साठणारे पाणी अनेकांना मृत्यू चे दारा जवळ पोहीचवत आहे शनिवारी याचा प्रत्यय आला तर वारंवार मदतकार्य देऊन अपघातग्रस्तांचे प्राण  वाचवण्यासाठी धावणाऱ्या युवकांना एकत्रित येऊन उपसरपंच शुभम पवार यांना भुईंज प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी व अन्य सदस्य तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर महामार्ग प्राधिकरण व जिल्हा प्रशासन विरोधात संतप्त  भावना व्यक्त केल्या,
   यावर उपसरपंच शुभम पवार यांनी दोन दिवसांत यावर उपाययोजना न केल्यास ग्रामस्थांचे वतीने तीव्रआंदोलन छेडणार असल्याचे सांगितले,
   तर भुईंज प्रेस क्लबचे  वतीने ही या गँभिर प्रश्नावर लक्ष देत प्रेस क्लबचे संस्थापक जयवंत पिसाळ,मार्गदर्शक महेंद्र आबा जाधव,अध्यक्ष राहुल तांबोळी,खजिनदार विलास साळुंखे,यांचे मार्गदर्शनाखाली सर्वच पत्रकारांनी एकत्रित येऊन आंदोलन करणार असल्याचे सांगितले ,

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त