साताऱ्यातील लिंब या गावात मुलीना प्रायव्हेट पार्ट दाखवत मनात लज्जा उत्पन्न करण्याचा किळसवाणा प्रकार

सातारा : साताऱ्यात लिंब येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या युवती सोबत किळसवाणा प्रकार घडला असून या बाबत तालुका पोलीस ठाणेत अश्लील हावभाव करून मनास लज्जा उत्पन्न केल्या प्रकरणी युवतींने तक्रार दिली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बदलापूर घटनेनंतर समाज मन ढवळुन निघाले असतानाच साताऱ्यात देखील एका ३३ वर्षीय युवकाने विकृत लिंगपिसाट मानसिकतेचे दर्शन घडवले. 

 

गुरुवार २२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे लिंब येथील महाविद्यालयात विध्यार्थीनी जात आसताना येथील ब्रिजवरून एका विकृत मानसिकता असलेल्या अज्ञात युवकाने युवतींच्या कडे पाहत स्वतःच्या प्रायव्हेट पार्ट दाखवत किळसवाणे अश्लील हावभाव केले. ज्यामुळे जाणाऱ्या युवतींच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. याबाबत संबधित युवतींनी जाब विचारला असता संबधित युवकाने युवतीच्या पाठीमागे धावत पाठलाग करून युवतीचा हात धरला तसेच मनात लज्जा उत्पन्न होईल असे किळसवाणे कृत्य केले. घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती विद्यार्थीनीनी शिक्षकाना दिल्या नंतर. या घटनेचे गांभीर्य ओळखून याची माहिती महाविद्यालयाने तालुका पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाला दिली. त्यानंतर निर्भया पथकाने घटनास्थळी धाव घेतली. व संबधित विकृत मानसिकता बाळगणाऱ्या व अश्लील हावभाव करून हिडीस कृत्य करणाऱ्या अज्ञात युवकाला ताब्यात घेतले. संबधित विकृत लिंगपिसाट याने महाविद्यालया कडे येण्या जाण्याच्या ब्रिजवरच किळसवाणे कृत्य केले असल्याने. लिंब व परिसरातील युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

 

राज्यात महिला युवती अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस घडतच असून याबाबत गांभीर्याने कठोर पावले उचलणे आवश्यक बनले आहे. सातारा तालुका हद्दीत शिक्षणासाठी प्रवास करत येणाऱ्या जाणाऱ्या युवतींना प्रवासा दरम्यान नित्य अडचणीचा सामना करावा लागतो.

 

 राज्यात घडणाऱ्या ताज्या घटना मुळे अशा विकृत लोकांना चाप बसण्यासाठी हे हिडीस कृत्य करणाऱ्या युवकावर काय कारवाई होणार याकडे देखील लक्ष लागले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त