पंचायत समित्यांमधील ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड तपासणार

सातारा जिल्हा परिषद प्रशासनाचा निर्णय
Will check records of Gram Panchayats in Panchayat Committees

सातारा : आपले सरकार सेवा केंद्र या नावाने बनावट खाते काढून 45 लाखांचा घोटाळा झाल्याची बाब खटाव तालुक्यात उघडकीस आल्यानंतर सातारा जिल्हा परिषदेने तालुका व जिल्हास्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत.
या माध्यमातून जिह्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये ग्रामपंचायतींच्या रेकॉर्डची तपासणी करण्यात येत असून, याबाबत ग्रामसेवकांना तत्काळ माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.ग्रामपंचायतींच्या अग्रीम रकमेचे युटीआर व चलनांचा ताळमेळ न बसल्याने जिल्हा परिषदेने चौकशी सुरू केली होती. तालुक्यांचा आढावा घेतल्यानंतर खटाव तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या अग्रीम रकमेबाबत साशंकता निर्माण झाली होती. याबाबत चौकशी केल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र मोबदला या बनावट बँक खात्यावर 45 लाख 13 हजार 888 रुपये ग्रामपंचायतींच्या अग्रीम रकमेचे जमा करण्यात आले. त्यापैकी 45 लाख 11 हजार 330 रुपये काही व्यक्तींच्या नावे वेळोवेळी वर्ग झाल्याचे चौकशीअंती पुढे आले आहे.दरम्यान, प्रत्येक तालुकास्तरावर समिती गठीत करून ग्रामपंचायतींच्या रेकॉर्डची तपासणी करण्यात येत आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. तालुकास्तरीय समित्यांच्या अहवालाचा अभ्यास करून ही चौकशी आठ दिवसांत अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. ग्रामपंचायतींच्या अग्रीम रकमेचा अपहार झाल्यानंतर जिह्यात खळबळ उडाली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला