सत्तुराने वार करुन खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास 2 तासात अटक
- Satara News Team
- Sun 6th Aug 2023 01:23 pm
- बातमी शेयर करा
सातारा : एक महिलेच्या पतीस शिव्या का देतो? असे विचारल्याच्या कारणावरुन तिघांनी सत्तुराने डोक्यात व हातावर वार करुन गंभीर जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील कुमठे गावात शनिवारी सकाळी घडली होती. या प्रकरणी संबंधित हल्लेखोरांपैकी एकास बोरगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांच्या पथकाने 2 तासात अटक केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवार दि. 05 रोजी सकाळी 11.15 वा.चे सुमारास कुमठे ता. जि. सातारा येथे फिर्याद दाखल केलेल्या एका महिलेच्या पतीस शिव्या का देतो असे विचारल्याच्या कारणावरुन ३ जणांनी सत्तुराने डोक्यात व हातावर वार करुन गंभीर जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत बोरगांव पोलीस ठाणे येथे गुरनं. 360/2023 भादविसंक. 307,324,323, 504, 506, 34 प्रमाणे खुनाचे प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता.
या घडलेल्या घटनेचे व गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापु बांगर यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हयातील आरोपींना अटक करण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यकी पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उप-निरीक्षक अमीत पाटील यांचे अधिपत्याखाली पथके तयार करुन त्यांना आरोपींचा शोध घेवून ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता त्यांना सदर गुन्हा अभिलेखावरील सराईत इसमाने केला असल्याची व तो सातारा येथे त्याचे मित्रास भेटुन लातुर येथे पळुन जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी प्राप्त माहिती तपास पथकास देत गुन्हयातील मुख्य आरोपीस ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर सहा.पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उप-निरीक्षक अमीत पाटील यांचे तपास पथकांनी मुख्य आरोपीस ढोरगल्ली परिसरात सापळा लावुन तो लातुर येथे पळुन जाण्याचे बेतात असतानाच त्यास ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केला असल्याची व तो त्याचे मित्रास भेटुन लातुन येथे पळुन जाणार असल्याची कबुली दिली. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाचे प्रयत्नाचे गुन्हयातील आरोपीस गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 तासाच्या आत जेरबंद करुन त्यास पुढील तपासकामी बोरगांव पोलीस ठाण्याचे ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. अरुण देवकर, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक, अमीत पाटील, पो.हवा. संजय शिर्के, शरद बेबले, सचिन साळुंखे, लैलेश फडतरे, सनी आवटे, प्रविण फडतरे, हसन तडवी, पो.ना. अमित सपकाळ, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, पो.काँ. रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वी जाधव, संकेत निकम चालक पो.हवा. शिवाजी गुरव यांनी केली आहे.
स्थानिक बातम्या
दिवाळी दहा दिवसांवर तरीही फटाके विक्रीची परवानगी नाही.
- Sun 6th Aug 2023 01:23 pm
शिवथर मध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे आगमन
- Sun 6th Aug 2023 01:23 pm
मुंबईत टोलमाफी; साता-याला का नाही?
- Sun 6th Aug 2023 01:23 pm
श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ साताराच्या शालेय क्रीडास्पर्धेत यशस्वी भरारी...
- Sun 6th Aug 2023 01:23 pm
कारखानदारांविरोधात कराड-उत्तर मधून लढवणार निवडणूक: वसिम इनामदार.
- Sun 6th Aug 2023 01:23 pm
संबंधित बातम्या
-
महागडा मोबाईल परत करून दाखविला प्रामाणिकपणा
- Sun 6th Aug 2023 01:23 pm
-
पोलिसांची अॅक्शन अन् 'कहानी खत्म'.... गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणारांना उंब्रज पोलिसांचा हिसका
- Sun 6th Aug 2023 01:23 pm
-
फलटण येथील हॉटेल आनंद विलास च्या खाद्यपदार्थात चक्क पालींचा रहिवास?
- Sun 6th Aug 2023 01:23 pm
-
कराडजवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 5 कोटींची रक्कम लुटली
- Sun 6th Aug 2023 01:23 pm
-
मलकापूरात युवकांमध्ये मारामारीत युवकावर चाकू हल्ला
- Sun 6th Aug 2023 01:23 pm
-
प्रेमप्रकरणाच्या संशयावरून जळगाव खून प्रकरणी संशयिताच्या भाऊ व वहिनीला अटक
- Sun 6th Aug 2023 01:23 pm
-
माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी येथे चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला.
- Sun 6th Aug 2023 01:23 pm
-
कोरेगाव येथे प्रेम प्रकरणाच्या संशयावरून जीवे मारण्याचा प्रयत्न
- Sun 6th Aug 2023 01:23 pm