पसरणी घाटातील 19 बेकायदेशीर होर्डिंगवर कडक कारवाई

सातारा : मुंबईतील घाटकोपर मधील दुर्घटनेनंतर वाई तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग सतर्क झाले असून विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. पसरणी घाटात बांधकाम विभागाची परवानगी न घेता लावलेले व धोकादायक असलेल्या तब्बल 19 होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. पसरणी घाट ते पाचगणी पर्यंतचे घाटातील बेकायदा उभारलेल्या फ्लेक्स व होर्डिंग्स विरोधात सार्वजनिक बांधकाम विभाग आक्रमक झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी गट आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक घेत सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांना बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी आपआपल्या तालुकयातील घटना मार्गावर लावण्यात आलेल्या बेकायदेशीर हार्डिंग्जची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, गुरुवार, दि. 30 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते महेश गोजरी यांच्या मार्गदर्शनाखाली पसरणी घाटातील अनेक वळणावर रस्त्याच्या कडेला उभारलेल्या फ्लेक्स व होर्डिंगवर कारवाईला सुरुवात करण्यात आली. अधिकाऱ्याच्या कारवाईमुळे बेकायदा होर्डिंग उभारणी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याचबरोबर घाटातील 20 बेकायदा होर्डिंग असून बांधकाम विभागाची ही कारवाई दोन दिवस राबवण्यात येणार आहे. हॉटेल व्यवसायिकांनी जाहिरातीचे फ्लेक्स स्वतःहून काढून घ्यावेत, अन्यथा प्रशासनाकडून दण्डात्मक कारवाई करून फ्लेक्स काढून घेतले जातील, असा इशारा बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त