विक्रमबाबा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम.

Various social activities on the occasion of Vikram Baba Kadam's birthday.

पुसेसावळी : वर्धन अॅग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक,संयमी, उच्चविद्याविभूषित समाजाभिमुख युवा नेते विक्रमबाबा कदम यांचा बुधवार दिनांक २७ जुलै रोजी वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला नव्हता मात्र यावर्षी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्ताव विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
      विक्रमबाबा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पुसेसावळी व औंध परिसरातील गावोगावी २६ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात येणार असून त्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी विक्रमबाबा सोशल फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आली आहे दिनांक २६ व २७ जुलै रोजी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी मधील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे. दि.२७ रोजी सकाळी १० वाजता पुसेसावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महा रक्तदान शिबिर घेण्यात येणार असून प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट किंवा ३२ जीबी पेनड्राईव्ह सप्रेम भेट देण्यात येणार आहे.

 

विक्रमबाबा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पुसेसावळी-औंध परिसरातूनच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामधून वर्धन अॅग्रो कारखान्याचे सभासद, उत्पादक शेतकरी,कष्टकरी, जेष्ठ नागरिक,युवा मित्र सामाजीक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते येत असतात. त्यासाठी कलाई गार्डन मंगल कार्यालय पुसेसावळी येथे सायंकाळी ०५:०० वाजता विक्रमबाबा शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्नेहभोजनाचे देखील आयोजन केलेले आहे अशी माहिती विक्रमबाबा कदम वाढदिवस संयोजन समितीचे अध्यक्ष मा.तुषार मोहिते यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उपयोग होईल म्हणून कार्यकर्त्यांनी येताना शाल,श्रीफळ, हार-तुरे,केक मिठाई न आणता शालोपयोगी साहित्य घेऊन यावे असे आवाहन वाढदिवस संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त