एकाच खोलीत एकाने पेटवून तर एकाची गळफास घेऊन आत्महत्या; घटनेने कोरेगावात खळबळ

कोरेगाव : सातारा जिल्ह्यातील कोरेगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरेगाव शहरात एकाच खोलीत दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सीमधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दोन युवकांनी राहत्या रुममध्ये रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली आहे. यामध्ये एकाने पेटवून घेतले तर एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. या भयंकर घटनेने कोरेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या तरुणांनी आत्महत्या का केली असावी याबद्दलचे कारण अद्याप समोर आले नाही. दोन तरुणांनी एकाचवेळी एकाच रुममध्ये आत्महत्या करणे संशयास्पद असल्याने याबाबत सखोल तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेचा कोरेगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला