सातारा लोकसभेचे उमेदवार छ.उदयनराजे भोसले यांनी सात वाजून सात मिनिटांनी केले मतदान

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला उत्साहात सुरूवात झाली आहे. सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यात हाय व्होल्टेज लढत होत आहे. या लढतीकडे राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, खा. उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले, पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी अनंत इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर मतदान केलं.

सकाळी लवकर जलमंदिर पॅलेस येथे छ. उदयनराजे भोसले यांनी भवानी मातेचे दर्शन घेतले यानंतर त्यांच्या पत्नी सौ दमयंतीराजे भोसले यांनी त्यांचं औक्षण केलं यानंतर सातारातील अनंत इंग्लिशस्कूल शाळेमध्ये छ. उदयनराजे भोसले छत्रपती कल्पनाराजे , भोसले छत्रपती सौ.दमयंतीराजे भोसले यांनी बरोबर सात वाजून सात मिनिटांनी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी उदयनराजे यांनी सातारकरांनी मोठ्या प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावा व योग्य उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त