औंध पोलीस स्टेशनचे नवे कारभारी मा.चिमणाजी केंद्रे.

औंध  : औंध पोलीस स्टेशन च्या हद्दीतील बेकायदेशीर अवैध धंदे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांची कामगिरी "उत्तम" राहिली. त्यानंतर मुदतबाह्य झालेल्या पोलिस स्टेशन च्या इमारतीने दगा दिला आणि त्याचे खापर मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्यावर फुटले. त्यानंतर तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचा पदभार दत्तात्रय दराडे यांनी स्विकारून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती साजेशी कामगिरी बजावत असतानाच अवैध धंद्यांवर आलेले दडपण कमी करण्याच्या उद्देशाने झालेल्या कुरघोड्या साध्य करत त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. 
              ऐन पोलिस ठाण्याचा चार्ज रिकामा असल्याची संधी साधून पुर्वनियोजीत कट रचून हद्दीतील पुसेसावळी येथे हत्याकांड घडवून आणण्यात आले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी धोंडीराम वाळवेकर यांनी औंध च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला मात्र चार महिन्यांसाठी तात्पुरती सुत्रे संभाळत केलेली कामगिरी ही तात्पुरतीच ठरली. 
         सध्या औंध येथील सहायक पोलिस निरीक्षक पदाचा पदभार मुळचे नांदेड जिल्ह्यातील असलेले मा.चिमणाजी वैजनाथ केंद्रे यांनी स्विकारला असून त्यांनी कला शाखेतून पदवी घेतल्यानंतर २०१० साली पोलिस प्रशासनात रूजू झाले. त्यांनी यापूर्वी पुणे शहर,सोलापूर  कुर्डुवाडी,पंढरपूर,शिरवळ येथे कार्यरत असताना केलेली कामगिरी हि दबंग असल्याची चर्चा असल्याने आता औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायीकांचे धाबे दणाणले असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त