गंभीर मारहाण केलेल्या युवकांचा उपचारादरम्यान मृत्यू संशयितावर खूनाचा गुन्हा दाखल

A case of murder has been registered against the suspect who died during the treatment of severely beaten youth

सातारा : वाढेफाटा येथील शिवतेज हॉटेलसमोर सदरबझार येथील एकाने दारूच्या नशेत मारहाण केलेल्या युवकांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. सचिन उमेश कांबळे (वय 36, रा. जयमल्लार हौसिंग सोसायटी सदरबझार सातारा) असे मयताचे  नाव आहे. या प्रकरणी महेश रमेश सपकाळ(वय 24,रा. वाढे ता. सातारा) यांच्यावर खूनाच्या कलमाअर्तंगत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयत सचिन उमेश कांबळे यांच्या डोक्यात मार लागल्याने तो सदरबझार येथील घरी गेला. यावेळी त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने त्याला उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारदरम्यान, त्यांचा दि. 4 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. सचिन चा मित्र महेश सपकाळ याने दारूच्या नशेत त्याला मारहाण करून डोक्यात गंभीर दुखापत  केली. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस महेश सपकाळ हा जबाबदार असल्याने त्याच्या विरूद्ध आत्या मीना नारायण कांबळे(वय 35, रा. गुरूवार पेठ सातारा यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.के. मोरे करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला