राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा

सातारा  : लोकसभा निवडणुका आता अगदीच जवळ आल्या आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या साताऱ्याच्या जागेचा सस्पेन्स आता संपला आहे. महाविकास आघाडीकडून साताऱ्याच्या उमेदवाराचं नाव जाहीर झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आता शशिकांत शिदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.लढवण्यास नकार दिला होता. तेव्हापासून मविआचा साताऱ्यातील उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू होती. मध्यंतरी या जागेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नावही चर्चेत आलं होतं. मात्र आता साताऱ्याच्या जागेचा सस्पेन्स संपला असून शशिकांत शिंदे हे साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना लोकसभेसाठी तिकीट देण्यात आलं आहे. त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता.

महायुतीकडून उमेदवाराच्या नावीच आज होणार घोषणा ? 

महायुतीने अद्याप साताऱ्यासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केलेलं नाही पण उदयनराजे यांनाच इथली उमदेवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. आज भाजपची ९वी यादी जाहीर होणार असून त्यामध्ये साताऱ्याचा उमदेवारही जाहीर होऊ शकतो. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांच्या नावांची आज घोषणा होऊ शकते. त्यामध्ये साताऱ्यासाठी उदयनराजेंचं नाव जाहीर होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल. महायुतीने उदयनराजेंना लोकसभेसाठी तिकीट दिल्यास साताऱ्यामध्ये मविआचे शशिकांत शिंदे वि. महायुतीचे उदयनराजे भोसले असा सामना रंगू शकतो.

तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि स्वाभिमानी विचारांचा वारसा प्रखर करूया! असं ट्विट अधिकृत अकाऊंट वरून करण्यात आलं आहे. स्वत: पृथ्वीराज चव्हाण यांनीही साताऱ्यातून लढण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे साताऱ्याच्या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण आता पृथ्वीराज चव्हाण यांचा पत्ता कट झाला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त