अतीत (ता. सातारा) येथे शेडमध्ये छुप्या पद्धतीने चालु आसलेल्या जुगार अड्ड्या वर छापा
Satara News Team
- Sun 16th Apr 2023 10:24 pm
- बातमी शेयर करा
सातारा : पुणे- बंगळूर महामार्गावर असलेल्या अतीत (ता. सातारा) येथे एका वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेडमध्ये छुप्या पद्धतीने जुगार अड्ड्या सुरु होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये 8 जणांसह 2 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतला.याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुका हद्दीत अतीत येथे वाघ वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या शेडमध्ये काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांना मिळाली. त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी छापा टाकला. यावेळी अजय शिवाजी कारंडे, राजेंद्र महादेव जगताप, प्रदीप कृष्णा यादव, अशोक राजाराम निकम, सुखदेव गणपती निकम, रोहित सुरेश यादव (सर्व रा. अतीत), सतीश संभाजी मोरे (रा. रामकृष्णनगर), निखिल अंगद चव्हाण (रा. आंबळे, ता. पाटण) हे जुगार खेळत असताना आढळून आले.
यावेळी त्यांनी तात्काळ संबंधितांना ताब्यात घेतले. तसेच जुगार अड्ड्यावरून 8 हजारांची रोकड, मोबाईल आणि दुचाकी असा 2 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बोरगाव पोलीस ठाण्याचे हवालदार राजू शिंदे, राजेंद्र माने, संतोष चव्हाण पोना दादा स्वामी, किरण निकम, राहुल ढोणे यांनी कारवाईत सहभाग घेतला. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sun 16th Apr 2023 10:24 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 16th Apr 2023 10:24 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 16th Apr 2023 10:24 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 16th Apr 2023 10:24 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 16th Apr 2023 10:24 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 16th Apr 2023 10:24 pm
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 16th Apr 2023 10:24 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sun 16th Apr 2023 10:24 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Sun 16th Apr 2023 10:24 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Sun 16th Apr 2023 10:24 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sun 16th Apr 2023 10:24 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sun 16th Apr 2023 10:24 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sun 16th Apr 2023 10:24 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sun 16th Apr 2023 10:24 pm












