दहिवडीतील दुकान फोडून चोरी ; गुन्हेगाराच्या दहिवडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या...

२२ हजार ५०० रक्कम हस्तगत ; २४ तासाच्या गुन्हा उघडकीस

आंधळी ता : २६  माण तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या दहिवडी गावांमध्ये गुंडगे सुपर मार्केट किराणा व भुसार मालाचे दुकानाचे दरवाजे लोखंडे शटर कटावणीच्या साह्याने उचकटून लावलेले नट बोल्ट काढत आतमध्ये प्रवेश करून दुकाना5/26/2025, 8:28:19 PMतील कॅश व कपाटातील ठेवलेली रोख रक्कम असे ६० हजार रुपयेची अज्ञात चोरट्याने चोरी केले असून 


याबाबत चैतन्य सुरेश गुंडगे रा. दहिवडी यांनी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दहिवडी मधील किराणा व भुसार मालाचे दुकानाचे चोरी झाल्याने दिलेले फिर्यादीवरून तपास करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे पुसेगाव परिसरात शोध घेऊन सराईत गुन्हेगार अभिजीत कालिदास पवार,आदित्य कालिदास पवार रा. वटणे ता. खटाव यांना ताब्यात घेऊन गुन्हेगामी अटक केली असता सदर गुन्हा केला असल्याचे कबुली दिली असून गुन्हातील चोरीस गेलेली रोख रक्कम २२ हजार ५०० हस्तगत करत सदरचा गुन्हा २४ तासाच्या उघडकीस आणला.


 तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, सोनाली कदम उपविभागीय अधिकारी अतिरिक्त दहिवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, पो.हवा.वावरे, खांडेकर, नाईक, नितीन धुमाळ महिला पोलीस रासकर, पोलीस कॉन्स्टे. महेंद्र खाडे, निलेश कुदळे, गणेश खाडे,राम फड,सागर लोखंडे यांनी कारवाई केली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला