पसरणी येथे वीज पडुन ३८ बकरऱ्यां व ३५ लहान कोकरे गाळात रुतून मृत

वाई: वाई व परिसरात दुपारी विजांच्या कडकडाटात झालेल्या मुसळधार पावसात  पसरणी (ता वाई)येथे वीज पडुन ३८ बकरऱ्यां मृत झाल्या.   पुरात ३५ लहान कोकरे गाळात रुतून मृत झाली. यात जगन्नाथ श्रीपाती कोळेकर ( मूळ रा. नांदल, ता. फलटण, सध्या रा. पसरणी ) या मेंढपाळचे सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले. 


     वाई परिसरात आज दुपारी अचानक मुसळधार पावसाने झाला. यावेळी विजांच्या गडगडाट व सोसाट्याचा वारा ही सुटला होता.  सुमारे एक तास  मुसळधार पाऊस कोसळत होता. यावेळी जगन्नाथ श्रीपाती कोळेकर ( रा.नांदल, ता. फलटण, सध्या रा. पसरणी ) हे बकऱ्या चरण्यासाठी डोंगरात गेले होते. गावातील नवाब बंगल्याच्या मागील बाजूस ट्याळमुखाच्या पायथ्याला असलेल्या वडाच्या झाडाखाली पावसापासून वाचण्यासाठी बकऱ्या जमा झाल्या होत्या. यावेळी विज पडून ३८ बकऱ्या जागेवरच मृत झाल्या. तर सुमारे ३०-३५ लहान कोकरे पुरात वाहून जाऊन लागतच्या बंधाऱ्याचा गाळात गडप झालीत. सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच त्यांनी तातडीने डोंगराकडे धाव घेतली. घटनेचे गाभीर्य पाहून उपसरपंच बद्रीनाथ महांगडे व युवा नेते स्वप्नील गायकवाड यांनी शासकीय यंत्रणाना फोन करून घटनेची माहिती दिली. 


    वाईच्या तहसीलदार साेनाली मेटकरी यांनी घटनास्थळाची पाहणी करून मेंडपाळास धीर दिला  तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना मंडळाधिकारी विश्वनाथ कांबळे यांना दिल्या. यावेळी नायब तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. जितेंद्र पाठक,  तलाठी अमोल कुंभार, बाजार समितीचे संचालक तानाजी कचरे आदी उपस्थित होते. 


   दरम्यान आमदार मकरंद पाटील यांनीही दूरध्वनीवरून सदर घटनेची माहिती घेऊन योग्य पद्धतीने कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले. 
     पंचनामा केल्यानंतर सदर मेंढ्या तरुणांनी बाहेर काढल्या व ट्रॉलीच्या सहाय्याने  जेसीबीने खड्डा काढून त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर खड्ड्यामध्ये त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. 


   सुमारे ४० वर्षापासून कोळेकर आपल्या मेंढ्या चारण्यासाठी पसरणी येथे येत असतात त्यांच्यावर अचानक  आलेल्या संकटामूळे त्यांनी अक्षरशा टाहो फोडला. पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या मेंढ्या डोळ्या देखत  मरताना पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते.

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त