पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्या प्रकरणी बारामतीत 15 जणांवर गुन्हा दाखल..

शाईफेक प्रकरणाचे बारामती कलेक्शन उघड; पाटलांना काळे फासणाऱ्याला सोमेश्वर कारखान्याच्या संचालकाने 51 हजार रुपयांचे बक्षीस केले होते जाहीर..

बारामती : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक प्रकरणात बारामती कनेक्शन उघड झालेय. बारामती शहर पोलीस ठाण्यात शाई फेकणारा मनोज गरबडे आणि चितावणी देणारा बारामतीतल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक ऋषिकेश गायकवाड याच्या सह अन्य 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी भाजपाचे बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी फिर्याद दिली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी भीक मागून शाळा चालवल्या असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून अनेक ठिकाणी पाटील यांचा निषेध करण्यात आला. बारामती तालुक्यातल्या करंजेपूल येथे काल पाटील यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांना काळे फासणाऱ्या इसमाला आपण 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊ, असे जाहीर आवाहन सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच पिंपरी चिंचवड मध्ये कार्यक्रम आटोपून येताना चंद्रकांत पाटील यांच्यावर  मनोज बरकडे याने शाही फेकली. त्यानंतर या घटनेचे समर्थन करत ऋषिकेश गायकवाड यांनी मनोज बरकडे याला 51 हजार रुपयांचा बक्षीस देऊन त्यांचा बारामतीत भव्य सत्कार करण्यात येईल असे सोशल मीडिया वरून जाहीर केले. 
 
 चंद्रकांत पाटील यांच्यावर  झालेल्या शाईफेक प्रकरणाचे बारामती कनेक्शन असल्याचे लक्षात येताच भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बारामती पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता  353,109,143,149,504,506 नुसार ऋषिकेश गायकवाड मनोज गरबडे यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास बारामती पोलीस करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त