दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून

पाटण : दारू पिण्यास पैसे देत नसल्याने व भंगार गोळा करण्यास सांगत असल्याने चिडून जावून मुलानेच भंगार गोळा करणाऱ्या बापाचा खून केल्याची माहिती पाटण पोलिसांना या खूनप्रकरणी ताब्यात घेतलेल्या मुलाकडून मिळाली आहे.

याबाबत पाटण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. 2 रोजी पावणे दहाच्या सुमारास पाटण येथे पाटण ते चाफोली जाणाऱ्या रोडलगत बी.एस.एन.एल. ऑफिसच्या समोरील स्मशानभुमीत एक इसम पडला असून त्याच्या डोक्यातून रक्त आले आहे, असा डायल ११२ वरून पाटण पोलिसांना कॉल आला‌. या बातमीची खात्री करण्याकरीता हवालदार मोरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यानंतर सहा. पोलीस फौजदार भरते, हवालदार पुजारी, माने, चालक गुरव असे शासकीय जीपने रवाना होवून घटनास्थळी पोहोचले. सदर ठिकाणी अंदाजे ४० वर्षे वयाचा पुरूष त्याच्या डोक्यात मारहाण होवून रक्त येवून तो जागीच मयत झालेला होता. सदर इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून डोक्यात व कानावर कोणत्यातरी हत्याराने वार करून ठार मारल्याचे स्पष्ट झाले.

मयताची ओळख स्थानिक ग्रामस्थांचे मदतीने पटवित असताना मयत इसम हा कातकरी समाजाचा असल्याचे समजले. कातकरी समाजाचे पाटण नगरपंचायतीचे नगरसेवक संतोष पवार हे तेथे आल्यानंतर त्यांनी मयत त्यांच्या कातकरी समाजाचा प्रकाश परशुराम पवार वय ४० वर्षे रा. मानेवाडी ता. जि. सातारा हल्ली रा. पाटण ता. पाटण हा असल्याचे सांगितले. मयताचे कोणीही नातेवाईक पाटण येथे नसल्याने त्याचे नातेवाईक यांची माहीती काढून वडील व दोन भाऊ यांना संपर्क करून त्यांना पोलिसांनी बोलावून घेतले. नातेवाईक वडील व दोन भाऊ यांनी मयतास ओळखून तो त्यांचा मुलगा व भाऊ असल्याचे सांगितले.

मयत प्रकाश पवार हा त्याचा अल्पवयीन मुलगा याचेसह पाटण येथे राहणेस होता. दोघेजण पाटण व आजूबाजूच्या परीसरामध्ये फिरून भंगार गोळा करुन व तो विकून त्यांचा उदरनिर्वाह करीत होते. सदर इसमाचा खून झाल्यापासून त्याचा मुलगा हा कोठेतरी निघून गेला होता. त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावल्याने गुन्ह्याच्या तपासकामी पथके तयार करून पोलीस निरीक्षक विकास पाडळे, सहा. पोलीस निरीक्षक. कामत यांचे वेगवेगळ्या पथकांनी अज्ञात आरोपीचा व मयताच्या मुलाचा शोध घेतला असता दि. 7 रोजी मयताचा अल्पवयीन मुलगा मिळून आला.

त्याच्याकडे चौकशी केली असता वडील हे जबरदस्तीने भंगार गोळा करण्यास सांगतात व दारु पिण्यास देत नाहीत, या कारणावरून त्यांच्या डोक्यात दगड घालून मारल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. याप्रकारे पाटण पोलिसांना खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले.

पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास पाडळे, सहा. पोलीस निरीक्षक संदीप कामत, सहा. पोलीस फौजदार भरते, हवालदार पुजारी, माने, चालक गुरव यांनी ७२ तासामध्ये या गुन्ह्याची उकल केली असून बापाचा खून करणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तपासामध्ये सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांनी अभिनंदन केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त