ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे घरात घुसले पाणी

दहिवडी : माण तालुक्याची राजधानी असलेल्या दहिवडी शहराच्या हद्दीतील पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या बिदाल फिडर कालव्याचे विनापरवाना खोदकाम करून कॅनॉल मधून गटर घेतल्याने शासनाची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने प्रभाग 15 मधील विकास नगर येथील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घुसत असल्याचे गेल्या काही दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्यांना नागरिकांनी पत्रव्यवहार करून कळवले होते.ठेकेदार बबन रेवा पवार यास पाटबंधारे विभागाने विनापरवाना खोदकाम करण्यापासून पत्रव्यवहार करून रोखले होते,परंतू संबंधित ठेकेदाराने त्या पत्रास कोलदांडा देत सदर काम पुर्ण केले आहे.

भविष्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कालव्यात पाणी येऊन तो फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरच्या कालव्यालगत असलेल्या लोकवस्तीत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाखा अभियंत्यांनी संबंधित ठेकेदारावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा नाइलाजास्तव आंदोलन करावे लागेल,त्यास ठेकेदार जबाबदार राहील असे पत्राद्वारे कळवले होते,परंतु पाटबंधारे विभागाने त्या पत्राचा विचार न करता केराची टोपली दाखवल्याचे निदर्शनास येत आहे.

बिदाल फिर कालव्याची मोडतोड करून अनधिकृत खोदकाम केल्याबाबत स्थानिक नागरिक अभिजीत शेवाळे यांनी पाटबंधारे विभागास पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले होते.त्यानंतर पाटबंधारे विभाग त्यांच्या मालकीच्या बिदाल फिडर कालव्याचे 40 मीटर खोदकाम करूनही ठेकेदारास शाखा अभियंता पाठीशी घालत असल्याची चर्चा माण तालुक्यात रंगली आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी दहिवडी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला.या पावसात अभिजीत शेवाळे यांच्यासह परिसरातील घरात कॅनॉलचे अनधिकृत काम केल्यामुळे घरात पाणी घुसून आर्थिक नुकसानीसह धान्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ठेकेदार बबन रेवा पवार यास ब्लॅक लिस्ट करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी विकास नगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.यामुळे ठेकेदारावर प्रशासन ब्लॅक लिस्ट करुन गुन्हा दाखल करणार का? असा सवाल माणवासिय विचारत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त