भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीला साथ करा.... संसदपटू सुप्रियाताई सुळे

संगीता माईंच्या कवितेने मेळाव्यात मिळवली वाहवा...!! वा रे वा भाऊराया.. वारे वा भाऊराया...! तू भलताच आहेस भोळा..!! दिड हजाराचा तुकडा टाकून मते करतो आहेस गोळा ! शिक्षणाच्या फी पायी भाचे राहीले वंचित ! त्रासून गेले सारे जण भान ठेव किंचीत ! गॅसचे पैसे भरून बहिणी झाल्या बेजार ! चूलीच्या धूराने आले शंभर आजार ! शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही नाही बोलत ! खते-बियाण्यावरचा टॅक्स कमी नाही करत ! टॅक्सच्या रूपाने दरोडा तू घालणार ! लाडकी बहिण म्हणून तू नौटंकी करणार ! आनाजीन केला दोन भावांचा घात ! स्वतः मात्र फिरत आहे साधूच्या वेषात ! आवळा देवून कोहळा काढण्यात आहेस तू हुशार ! बहिणी नाहीत भोळ्या दादा गोहाटीला हो पशार ...!! गद्दारांच्या मिंदेशाहीत आम्हाला नाही यायचं ! बाप आमचा खमक्या त्याच्या संस्कारातच रहायचं !! महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही प्राणपणाने लढू ! भिक द्यायची भाषा मात्र पुन्हा नको काढू ..!! सौ. संगिता तानाजीराव साळुंखे (माई)  सदस्या, राष्ट्रीय कार्यकारणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार.

मसूर : ७० दिवसावर येऊन ठेपलेल्या  विधानसभेच्या तयारीची सुरुवात मी स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या  पवित्र कराड नगरीतून करत आहे, त्यामुळे चौफेर यश महाविकास आघाडीचेच असेल पण त्याचबरोबर आमदार बाळासाहेब पाटील यांना विधिमंडळात पाठवण्यासाठीही सर्वांनी जोमाने कामाला लागावे असे प्रतिपादन संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले. अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब पाटील होते. 
   तर यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सह्याद्रीचे संचालक जशराज पाटील, महिला जिल्हाध्यक्ष संजना जगदाळे, शहाजी क्षिरसागर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या संगीता साळुंखे माई, प्रणव ताटे, जि. प. च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री भाग्यवंत, हेमाताई पिंपळे, समिंदरा यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुप्रियाताई सुळे पुढे म्हणाल्या, युतीचे सरकार हे एमबीबीएस म्हणजेच महागाई, बेरोजगारी, बनवेबाज व भ्रष्टाचारी सरकार असून यांच्यापासून भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी महाविकास आघाडीला संधी द्या. देशाचे नेते शरद पवार साहेबांनी महिलांना 50 टक्के आरक्षण देऊन सन्मान केला. त्यामुळेच महिला आज कर्तुत्व व नेतृत्व सिद्ध करत आहेत. त्यांना यापुढे विधानसभा व लोकसभेत आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महायुतीने इलेक्शनसाठी फक्त श्रीराम प्रभूच्या नावाचा वापर केला मात्र मर्यादापुरुषोत्तम अशी ख्याती असलेल्या रामाची कुठलीच मर्यादा महायुती सरकारने पाळली नाही. गप्प बसण्यात मोठी ताकत असते हे वडिलांनी शिकविले. पक्ष चिन्हासाठी लढू शकले असते. काहींनी पक्षाच चिन्ह मागितले असते तर  ते सुद्धा दिले असते. सर्वांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरावे, कारण आपण टॅक्स भरतोय तेच ते परतफेड करतायत काही उपकार करत नाहीत. त्यापेक्षा  प्रत्येक महिलेच्या हाताला काम दिले असते तर  अभिमान वाटला असता. मी आत्ताच सांगू इच्छिते की, महाराष्ट्रात राष्ट्रवादी, काँग्रेस व उबाठाची म्हणजेच महाविकास  आघाडीची सत्ता आल्यानंतर पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्याचा असेल. आणि हुंडा पद्धती व अधिक महिन्यातील धोंड्याचे जेवण या कुप्रथा बंद करणार आहे. बारामतीत लोकसभेला स्वाभिमानी जनतेने पैसे घेतले नाहीत.सत्ता, आणि पैशाला त्यांनी साफ नाकारले. जनतेच्या प्रेमामुळे मला यश मिळाले. साताऱ्यात आपण कमी पडलो पण यापुढे सावध पवित्रा घेऊ असे सांगून त्या म्हणाल्या बारावीनंतर ५ हजार देणार म्हणतायेत ते फक्त सहा महिनेच, सातव्या महिन्यात  तरुणांना हे सरकार टाटा बाय-बाय करतय की नाही बघा. योजनांच्या घोषणांपेक्षा  राज्यातल्या महिलांना पदर  पसरायला लागू नये  यासाठी सामाजिक परिवर्तन घडवा व गलिच्छ राजकारण बंद करा.
अध्यक्षस्थानावरून बोलताना आ.बाळासाहेब पाटील म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार आले आणि राज्याच्या अधोगतीला सुरुवात झाली. कर्जाचा बोजा वाढला, गुन्हेगारी वाढली, उद्योगधंदे बाहेर पळविले, ड्रायव्हरच्या माध्यमातून बळी गेले त्यांना या सरकारने पाठबळ दिले, नीट घोटाळा झाला, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रश्न अधांतरी ठेवले.  ज्यावेळी मला मंत्रीपदाची संधी शरद पवार साहेबांनी दिली. त्यावेळी स्व.यशवंतराव चव्हाण व आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या विचाराचे राजकारण करत महाभयंकर कोरोना काळातही आपण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले. मार्केट कमिट्या चालू ठेवल्या, रस्ते, पूल, पाणी योजना असा चौफेर विकास केला असे सांगून पावसातही मोठ्या संख्येने महिला उपस्थित असलेल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ज्याचा गुरू बळकट, कोण धरील त्याचे मनगट. शरद पवार साहेबांचे हे मनगट आणखीन मजबूत करण्यासाठी व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी संसदपटू  सुप्रिया सुळे व महाविकास आघाडीला सर्वांनी साथ व सहकार्य करावे.
यावेळी शशिकांत शिंदे, सुनील माने,संजना जगदाळे, रूपालीताई यादव, सौ. संगीतामाई साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वागत कराड उत्तर अध्यक्ष  देवराजदादा पाटील यांनी केले. प्रास्ताविक  शहाजी क्षीरसागर यांनी केले. तर आभार सुरेखा डुबल यांनी मानले.

 

जशराज पाटील यांचे नेटके नियोजन.....आ. पाटील यांची कृतज्ञता...!!
महिला मेळाव्यास सुमारे १० हजार महिला उपस्थित होत्या. सर्व मंडप खचाखच भरला होता. महिलांची गैरसोय होऊ नये  यासाठी सह्याद्रीचे संचालक जशराज पाटील यांनी  नेटके नियोजन केले होते.  मात्र तरीही पाठीमागून येणाऱ्या महिलांना पावसात उभे राहावे लागल्याने आणि  कुठलाही गोंधळाचा प्रसंग दिसून न आल्याने आमदार पाटील यांनी महिलांचे व उपस्थित राष्ट्रवादी प्रेमींचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त