मलवडी ता. फलटण गावाच्या हद्दीमध्ये धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून

फलटण : मलवडी ता. फलटण गावाच्या हद्दीमध्ये आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना उघड झाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मलवडी गावातील अनिल महादेव चव्हाण वय ३५ या इसमाचा आज सकाळी ६ वाजण्याच्यापूर्वी मलवडी गावाच्या हद्दीत अज्ञाताने धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली असून खुनाचे कारण अस्पष्ट आहे. घटनास्थळी फलटण ग्रामीण विभागाचे पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त