दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वनवा लावल्या प्रकरणी वन विभागाची कारवाई

वाई : वाई तालुक्यातील पश्चिम भागात दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वनवा लावल्या प्रकरणी वन विभागाने कारवाई केली या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की दिनांक 9/02/2024 पासून वाईच्या पश्चिम भागात आसरे, रेणावळे,खावली,कोंडवळे भागामध्ये वनवा लागत असल्याचे दिसून येत आहे व सदरचा वणवा विझवण्यासाठी वन अधिकारी व कर्मचारी दिवस रात्र प्रयत्न करत आहेत तरीही दिनांक 09/02/2024 रोजी रेनावळे येथे वनाधिकारी वणवा विझवत असताना मौजे रेणावळे (गोंजारवाडी) येथे श्रीमती शैला पांडुरंग सणस घराशेजारील आवारात पालापाचोळा जाळण्याच्या प्रयत्न करत असताना सदरचा वणवा वनक्षेत्रात जाऊन फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर 14 मधील वनक्षेत्रामध्ये वनवा लावल्याचे निदर्शनास आले सदर आरोपी यांना वनाधिकारी यांनी जागेवर पकडले त्यानंतर दिनांक 10/02/ 2024 रोजी दुपारी 2.30 वाजणेच्या सुमारास मौजे कोंढावळे,ता.वाई येथील आरोपी मंदा रामचंद्र कोंढाळकर यांनी त्यांचे शेतातील गवत पालापाचोळा जाळणेसाठी तयार केलेली आग वनक्षेत्रात जात असताना पाहिल्याने वनाधिकारी यांनी आरोपीस जागेवर पकडले.सदर वणव्यामुळे मौजे कोंढावळे फाॅ.कं.नं.8 मधील अंदाजे 04 हेक्टर वनक्षेत्र जळाले आहे.सध्या तालुक्यात विविध ठिकाणी वणवा लागत असुन वनाधिकारी जिवावर उदार होवुन वणवा विझवत असुन ग्रामस्थांनी भान राखणे गरजेचे आहे. सदर दोन्ही गुन्हेकामी वनरक्षक वडवली यांनी गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास चालु आहे.सदरची कारवाई मा.उपवनसंरक्षक सातारा अदिती भारद्वाज मॅडम, सहा.वनसंरक्षक सातारा श्री महेश झांझुर्णे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल वाई सौ स्नेहल मगर मॅडम,वनपाल वाशिवली एस.डी.लोखंडे,वनरक्षक वडवली आर.व्ही.भोपळे,यांनी पार पाडली

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त