घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणल्याची कामगिरी बोरगाव पोलीसांनी केली

देशमुखनगर : खोजेवाडी ता. सातारा येथे झालेल्या घरफोडीतील विजय गौतम बारहाते राहणार पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे या चोरट्यास बोरगाव पोलिसांनी अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेली रोख रक्कम आणि सोन्याची अंगठी व मोबाईल असा एकूण 96 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. वरिष्ठांच्या सूचनेनुसार खोजेवाडी येथील घरपोडीचा गुन्हा उघडकीस आणल्याची  कामगिरी बोरगाव पोलिस ठाण्याचे प्रकटीकरण शाखेने केली. 
   दिनांक 23 / 5 / 24 रोजी खोजेवाडी ता. सातारा येथे घरपोडी झाल्याचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. यामध्ये रोख  रक्कम, सोन्याची अंगठी आणि मोबाईल असा एकूण 1 लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार दादा स्वामी, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण यांना ही चोरी उघडकीस आणण्याची सूचना दिली. गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती घेऊन फिर्यादीच्या घरी यापूर्वी कामाला असलेल्या नोकरास ताब्यात घेऊन चोरीची चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करून त्याच्याकडून  चोरीस गेलेली 20,000 रुपये पैकी 2,500 रुपये रोख रक्कम तसेच सोन्याची अंगठी आणि मोबाईल असा 96 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. 
    ही कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल अप्पर अधीक्षक, राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी, रवींद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवलदार दादा स्वामी पोलीस, नाईक प्रशांत चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल विशाल जाधव यांनी कामगिरी बजावली या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विजय म्हेत्रे हे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला