राजवाडा बसस्थानकासमोर खड्डेच खड्डे - अपघाताला निमंत्रण; नगरपालिकेचे दुर्लक्ष

सातारा :  येथील राजवाडा बसस्थानकासमोर रस्त्याच्या मध्यभागी पडलेले मोठमोठे खड्डे नागरिक व वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून हे पडलेले खड्ड्याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. परिणामी याबाबत नागरिक व वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

रस्त्याच्या मध्ये पडलेल्या या खड्ड्यात अनेकदा पावसाचे पाणी साचत असल्याने ये जा करणाऱ्या वाहन चालकांना ते दिसून येत नाही. त्यामुळे वाहने ही खड्ड्यात आदळत असून अनेक वाहन चालकांचा वाहनावरचा ताबा ढळत आहे. त्यामुळे त्यांना शारीरिक इजा बरोबरच वाहनाची ही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राजवाडा बसस्थानकात ये जा करणाऱ्या प्रवासी व वाहनचालकांची संख्या मोठी आहे. त्याच्यासाठी हे खड्डे धोकादायक ठरत आहेत.

विशेषता समर्थ मंदिर व मंगळवार तळे कडून येणारे असंख्य वाहनचालकांना हे खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत आहे संबंधित विभागाने हे खड्डे त्वरित मुजवावे, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे . रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण पाहता सुरक्षित प्रवासासाठी उत्तम रस्ते काळाची गरज आहे सातारा शहरात विविध ठिकाणी रस्त्यामध्ये पडलेले खड्डे हे तातङीने मुजविणे आवश्यक आहे.

मनुष्यहानी टाळण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. राजवाडा बसस्थानक( चांदणी चौक) वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात ये जा असते या ठिकाणी सुरक्षिततेच्या कोणत्याच उपाययोजना नाहीत. येथील सिग्नल यंत्रणा ही बंद आहे, त्यातच पडलेल्या खड्ड्याची भर पडली आहे. नागरिक व वाहनचालकांच्या सुरक्षित प्रवासासाठी खड्डेमुक्त शहराचे नियोजन आवश्यक असल्याचे श्रीरंग काटेकर यांनी सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त