एका फायटीत बाहेर फेकले अन् थरार थांबला पुसेगाव- सातारा मार्गावर थरारक अपहरण नाट्य
तिचा संघर्ष : एका फायटीत वातावरण टाईटSatara News Team
- Mon 27th Jun 2022 07:03 am
- बातमी शेयर करा
या प्रकरणात अभिजित ज्ञानदेव फडतरे (वय- 31, रा. फडतरवाडी, नेर, ता. खटाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अॅड. जयश्री महेश गोरे (वय- 35, रा. रविवार पेठ, सातारा) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 25 रोजी मध्यरात्री घडली.
सातारा न्यूज पुसेगाव पुसेगावमध्ये मध्यरात्री एका महिलेसह बाळाला, मुलीला आणि युवती असलेली गाडी पळवून अपहरण करण्याचा डाव उधळला. संशयित युवकाने कारमध्ये जबरदस्तीने घुसून कार पळवली. अशावेळी कारमधील सर्वचजण भेदरलेले होते. मात्र, या परिस्थितीमध्येही महिलेने अर्धा किलोमीटरपर्यंत झालेल्या झुंजीत एका फायटीत बाहेर फेकले अन् थरार थांबला. यानंतर अवघ्या 3 तासात पुसेगाव पोलिसांनी रात्रीच सर्च आॅपरेशन राबवून संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
या प्रकरणात अभिजित ज्ञानदेव फडतरे (वय- 31, रा. फडतरवाडी, नेर, ता. खटाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अॅड. जयश्री महेश गोरे (वय- 35, रा. रविवार पेठ, सातारा) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 25 रोजी मध्यरात्री घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार अॅड. जयश्री गोरे या दि. 25 रोजी दुपारी पती अॅड. महेश, मुलगा विश्वजित (वय- 4 महिने), मुलगी वेदांतिका (वय- 8), भाची रुपाली (वय- 21) व त्यांचे दाजी उत्तम होळ यांच्यासोबत कामानिमित्त शिखर शिंगणापूर व नातेपुते येथे गेले होते. रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास ते नातेपुतेहून साताराकडे कारमधून (एमएच- 11- सीजी- 8181) यायला निघाले होते. रात्री 12 वाजता ते पुसेगाव येथे आल्यानंतर तहान लागल्याने पाणी घेण्यासाठी शिवाजी चौकात कार थांबवली.
यावेळी कारमधून अॅड. महेश गोरे व उत्तम होळ दोघेही खाली उतरले व पाणी बॉटल आणण्यासाठी गेले. यावेळी कारमध्ये अॅड. जयश्री गोरे ड्रायव्हर सीटलगत बसल्या होत्या व त्यांच्याजवळ त्यांचे लहान बाळ होते. तर पाठीमागे मुलगी व भाची बसलेली होती. पती व दाजी काही अंतरावर गेले असतानाच अचानक कारमध्ये अंदाजे एक 25 वर्षीय युवक ड्रायव्हर सीटवर बसताच तक्रारदार यांनी अनोळखी युवकाला ‘तू कोण आहेस? खाली उतर,’ असे म्हणताच त्याने कार स्पीडने चालवण्यास सुरुवात केली. यावेळी महिलेने आरडाओरडा करताच संशयित युवकाने साताराच्या दिशेने कार घेत महिलेला दमदाटी करण्यास सुरुवात केली. दमबाजी करतच तो चालक कार दामटवत होता. यावेळी कारमध्ये महिला व त्या चालकांमध्ये जोरदार झटापट सुरू होती.
या झटापटीत तान्हे बाळ सीटवरुन खाली पडले. सुमारे 7 मिनिटे हा थरार सुरु असतानाच महिलेने पुन्हा हॅन्ड ब्रेक ओढत पायाने स्टेअरिंगवर लाथ मारली. यामुळे संशयिताचा कारवरील ताबा सुटला व कार येरळा नदीचा मुख्य रस्ता सोडून मातीच्या असलेल्या ढिगावर जावून आदळून थांबली. ड्रायव्हर बाजूचा दरवाजा निघाल्यानंतर संशयित युवकाने अंधाराचा फायदा घेवून तेथून पळ काढला.
crime
Pusegaon
satarasp
sataracrime
satarapolice
SataraPoliceArrestedTwoPersoninRobberyCase
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 27th Jun 2022 07:03 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 27th Jun 2022 07:03 am
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Mon 27th Jun 2022 07:03 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 27th Jun 2022 07:03 am
संबंधित बातम्या
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Mon 27th Jun 2022 07:03 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 27th Jun 2022 07:03 am
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Mon 27th Jun 2022 07:03 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Mon 27th Jun 2022 07:03 am
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Mon 27th Jun 2022 07:03 am
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Mon 27th Jun 2022 07:03 am
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Mon 27th Jun 2022 07:03 am
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Mon 27th Jun 2022 07:03 am












