सातारा पोलीसांनी नागरिकांच्या चेहऱ्यावर आणले हसू ! गहाळ झालेले एकूण 506 मोबाईल लोकांना मिळाले परत..

4 महिन्यात एकूण 60 लाख रुपये किंमतीचे तब्बल 506 फोन तक्रारदारांना मिळाले परत..

सातारा: -सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि CEIR (Central Equipment Identity Register) ॲपच्या मदतीने, सातारा पोलिसांनी 2024 या चालू वर्षात जून महिन्यापर्यंत हरवलेले 506 मोबाईल फोन सामान्य जनतेला परत केले आहेत.सातारा पोलिसांनी जनतेच्या हितासाठी कार्यरत राहताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, हरवलेल्या मोबाईल फोनच्या शोधासाठी CEIR ॲपचा यशस्वी वापर केला आहे. या ॲपच्या माध्यमातून मोबाईल फोनची IMEI नंबरद्वारे ओळख पटवून त्यांचे ठिकाण शोधणे आणि संबंधित मालकांना परत करणे सुलभ झाले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची प्रतिक्रिया..

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, “सातारा पोलिसांची ही उल्लेखनीय कामगिरी म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीने हरवलेल्या मालमत्तेची पुनर्प्राप्ती आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. या यशस्वी उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास वाढला आहे.”

मोबाईल गहाळ झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू 

सर्व सामान्य जनता कर्ज काढून मोबाईल घेते.घेतलेले मोबाईल हरवले असतात किंवा चोरीस गेलेले असतात.तेव्हा त्याचे दुःख कोणाला सांगू शकत नाही. अशा लोकांचे मोबाईल परत मिळाल्याने जन सामान्यातुन पोलिस प्रशासनाविषयी प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येत आहे सातारा पोलिसांच्या या यशस्वी प्रयत्नामुळे जनतेमध्ये समाधानाची व आनंदाची भावना निर्माण झाली असून, हरवलेल्या मोबाईल फोनच्या शोधासाठी CEIR ॲपचा वापर वाढत चालला आहे. या उपक्रमामुळे सातारा पोलीस दलाचे कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे.

सातारा जिल्हा पोलीस दलात मोबाईलचा शोध मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मोबाईलचा शोध घेण्यासाठी सहभागी असणाऱ्या सर्व जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमलदार यांना मनापासून सलाम...

 

 

अन्न,पाणी,वस्त्र निवारा, या मानवाच्या मुलभूत गरजा असल्या तरी त्याच्यासोबत आता मोबाईलचा देखील समावेश करावा लागणार आहे. मोबाईल हे महत्त्वाचे जगण्याचे साधन झाले आहे.हे कोणी सांगण्याची गरज नाही‌.मोबाईल गहाळ अथवा चोरीला गेल्यानंतर होणारा त्रास दुःख हे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जाणले आहे व सातारा जिल्ह्यात मोबाईल शोध विशेष मोहीम राबवली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने गहाळ अथवा चोरीला गेलेले सुमारे अंदाजे रक्कम 60 लाखांहून अधिक किंमतीचे 506 मोबाईल फोन जनतेला परत केले आहेत .सातारा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली CEIR ॲपच्या माध्यमातून 2024 मध्ये 506 हरवलेले मोबाईल मिळवले असून सातारा जिल्हा पोलीस दलावर कौतुकाचा वर्षाव होत आहे..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त