गैरकृत्यासाठी रूम उपलब्ध करून दिल्याने हॉटेल किनाराच्या चालकासह तिघांवर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल

या अगोदर एका कॅफेवर पोक्सोंतर्गत गुन्हा नोंद झाला होता त्यातील संशयीत आरोपींना जामीन मंजूर कसा झाला. या कारवाईत पोलिसांच्या कारवाई बाबत पहील्या पासूनच संशय व्यक्त केला जात होता या वरून पोलीस कारवाई फक्त दिखाऊ पना आहे का ? अश्या कॅफे व हॉटेलवर पोलीसांचाच वरदहस्त आहे असा सवाल नागरिकांमधून होत आहे

सातारा : गैरकृत्यासाठी रूम उपलब्ध करून दिल्याने हॉटेल चालकासह तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेंद्रे, तालुका सातारा गावच्या हद्दीतील हॉटेल किनारा मध्ये चालक असलेला आकाश सुरेश माने राहणार डबेवाडी तालुका सातारा यांनी अल्पवयीन मुली तसेच त्यांच्या मित्रांना गैरकृत्यासाठी हॉटेलमधील रूम उपलब्ध करून दिल्याने संबंधित तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सातारा न्युजच्या बातमीने अणखी एक कारवाई झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे आधीक तपास   महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक आमदे आणि मेनकर करीत आहेत.

बुधवारी दुपारी शेंद्रे गावाच्या हाती असलेल्या हॉटेलमध्ये जयदीप संजय जाधव वय 19 व अर्जुन पवार वय 23 हे दोन अल्पवयीन मुलींना घेऊन आले होते त्यांना हॉटेल चालक अशोक माने वय 32 यांनी रूम उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे अशी हॉटेल किंवा कॅफे फक्त तालुका परिसरात नसून शहर परिसरात आणी  शाहुपुरी पोलीस ठाण्या अंतर्गत सुद्धा मोठया प्रमाणात आहेत 


पो.नी. विश्वजीत घोडके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आत्तापर्यंत तीन ते चार हॉटेलवर अशा कारवाई करण्यात आले आहेत परंतु अशी हॉटेल किंवा कॅफे फक्त तालुका परिसरात नसून शहर परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरु आहेत मग शहर पोलिसांच्या कारवाया अशा हॉटेलवर कॅफेंवर का होत नाहीत यामध्ये शहर पोलिसांचे लागेबांधे आहेत का असा सवाल सातारकर करत आहेत

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त