अन्न व औषध प्रशासन कारभाराच्या चौकशीची मागणी

कोरेगाव ;तालुक्यातील औषध वितरकांच्या गैरकारभाराला पाठीशी घालणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारभाराच्या निषेधार्थ २६ जानेवारी रोजी कोरेगावात लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आज्जु मुल्ला यांनी इशारा दिला असून तशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी यांना सादर करण्यात आले.
सातारा येथे कार्यरत असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयातून कोरेगाव तालुक्यातील औषध वितरकांना अनेक गैरप्रकारांमध्ये पाठीशी घातले जात आहे. यामध्ये माहिती मागून देखील माहिती दिली जात नाही, केवळ टाळाटाळ केली जात आहे. एकूणच या विभागाचा कारभार हा चुकीचा चालला असून त्यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनी दि. २६ जानेवारी रोजी कोरेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहे, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आजू मुल्ला यांनी दिला आहे.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता मुल्ला यांनी प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व अन्न व औषध प्रशासन विभागात सुरू असलेल्या गैरकारभाराची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. कोरेगाव तालुक्यातील औषध वितरकांबाबत असंख्य तक्रारी असताना देखील हा विभाग केवळ कागदोपत्री कारवाई केल्याचे दाखवत आहे. आजवर एकाही दुकानावर ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, केवळ जुजबी कारवाई केल्याचे दाखविले जात आहे. माहिती अधिकार कायद्याखाली मागितलेली माहिती देखील जाणीवपूर्वक विसंगत दिली जात असून त्यातून खरी माहिती दडविण्याचा प्रयत्न होत असल्याचे मुल्ला यांनी स्पष्ट केले.
हजारो सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या औषध वितरकांच्या मनमानी कारभाराला चाप लागला पाहिजे. अन्न व औषध प्रशासन विभागाने सर्वसामान्यांच्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करणार आहे. या आंदोलनास अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त हे जबाबदार राहणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ या विषयात लक्ष घालावे अन्यथा या पुढील काळात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही मुल्ला यांनी स्पष्ट केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त