रामकृष्णनगर ( काशीळ) येथे जुगार अड्डयावर छापा.

८ जणांसह लाखोंचा मुद्देमाल घेतला ताब्यात.

देशमुखनगर :  रामकृष्णनगर ( ता. सातारा ) गावच्या हद्दीत बिरोबा मंदिराच्या मोकळ्या जागेत बेकायदा तीन पानी जुगार खेळणाऱ्या ८ जणांना आज बोरगाव पोलीसांनी ताब्यात घेऊन जुगारातील रोख , मोबाईल तसेच मोटारसायकलींसह पावणेचार लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. 
     पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी स. पो. नि. रविंद्र तेलतुंबडे यांना गोपनीय बातमी मिळाली. रामकृष्णनगर ( ता. सातारा ) गावच्या हद्दीत बिरोबा मंदिराजवळच्या मोकळ्या मैदानात करंजाच्या झाडाखाली काहीजण जुगार खेळत आहेत. त्यावरून डि. बी पथकास योग्य त्या सुचना देऊन कारवाई करण्यास सांगितले. डी. बी. पथकातील कर्मचाऱ्यांनी तीन पानी जुगार अड्डयावर केलेल्या कारवाई मध्ये गणेश गुलाब कारंडे रा. अतित, भानुदास मसू कुऱ्हाडे, रा रामकृष्णनगर, नंदकुमार उत्तम पवार रा. बांबवडे, राजेंद्र मनोहर सुतार रा शिरगांव, विष्णु बापूराव कोळेकर रा काशिळ ,प्रदिप विनायक निंबाळकर रा. तुकाईवाडी, लहू रामचंद्र मोरे ,रा चिंचणेर (निंब) , तानाजी शामराव माने रा. काशिळ ता. सातारा , अशा ८   इसमांना जुगार खेळताना जागीच ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगारातील रोख रकमेसह मोबाईल व मोटारसायकलीसह ३,७३५०० रूपयेचा मुद्देमाल ताब्यात घेतला. 
       सदरची कारवाई स. पो नि. रविंन्द्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा, घाडगे, पो. कॉ. गायकवाड, तसेच डी. बी पथकातील कर्मचारी पो. ना. दादा स्वामी, किरण निकम, पो. कॉ प्रशांत मोरे यांनी केली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला