छ उदयनराजेंच्या विजयाचा पाया रचला म्हणणारा स्वयंघोषित गवंडी, माढ्यात मारत होता दवंडी..प्रविण धसके

ज्यांना आपण बगलबच्चे म्हणालात त्या मावळ्यांनीच आपल्या कर्तबगारीचा इतिहास ज्ञात असल्याने खऱ्या अर्थाने महायुतीतील व उदयन राजेंवर प्रेम करणाऱ्या इतर पक्षातील देखील मावळ्यांनी निवडणूक हातात घेतली.

दहिवडी : उदयनराजेंचे बगलबच्चे नव्हे मावळे असतात हे विसरणारा हा कावळा छत्रपतींच्या स्वराज्याच्या विचार जपणाराअसूशकतो ? हा प्रश्न निर्माण होतो कारण छत्रपती बद्दल बोलताना आपली घसरलेली जीभ त्यांनी ताब्यात ठेवावी उदयनराजे हेमहायुतीचे उमेदवार होते व महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादी,आरपीआय, शेतकरी संघटना,मनसे रासप,सारख्या पक्षांचे नेते वकार्यकर्ते देखील जीवापाड प्रेम करतात. याचे फलित म्हणूनच भाजपाच्या बूथ कमिटी सदस्या पासून नेत्यापर्यंतच्या सर्वांनी जीवाचं रान करून छ उदयनराजेंना निवडून दिले यावर आपण मात्र निवडणुकीत माढ्याच्या प्रचारात मशगुल होता.

उदयनराजेंच्या खांद्याला खांदा लावून स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंढे साहेबांचे मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी साताराजिल्ह्या मध्ये वाढवली असे डॉक्टर दिलीपजी येळगावकरांनी पत्रकार द्वारे आपणास घरचा आहेर दिलेलाच आहे.उदयनराजेदेशाच्या राजकारणातील एक दिग्गज नेते म्हणून गणले जातात हे सुद्धा आपण राजरोसपणे विसरताना दिसला याउलट जिल्ह्यात स्वयंघोषित नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्या चांडाळ चौकडीने काय दिवे लावले याचा लेखाजोखा पक्षातीलज्येष्ठ नेत्यांनी वरिष्ठांकडे पोहोचवला आहेच. निवडणुकीपूर्वी शिवराज सिंह चव्हाणसाहेब कामाप्रसाद तासा,रवींद्रजी चव्हाण अजयजी मिश्राजी यासारख्या नेत्यांचे निरीक्षण दौरे होत असताना गाडीत बसून व खाजगीत राजेंबद्दल जी आपण कान भरणी करताना फक्त भिंतीलाच नव्हे तर गाडीच्या दरवाजाला देखील काना असतात, हे आपण विसरलात यामुळे हा आपलाउद्योग देखील लपून राहिलेला नाही व दरम्यानच्या चर्चेत आपण उदयनराजेंना तिकीट मिळण्याबाबत किती प्रामाणिक होताहे देखील समजले या निमित्ताने लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण शिवलेल्या जॅकेटांची चर्चा पुसेसावळी जि प गटात खमंगपणे रंगलेली ऐकिवात आहे.खरे तर नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकी मध्ये सातारा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.श्रीमंत छत्रपतीशिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी निर्णायक मताधिक्यासाठी केलेला प्रयत्न संपूर्ण जिल्ह्याने पाहिला आहे याबरोबरच कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ना.महेश दादा शिंदे तसेच भाजपानेत्या डॉ.प्रियाताई शिंदे यांनी पायाला भिंगरी बांधून संपूर्णमतदारसंघ पिंजून आपल्या मतदारसंघातील स्थानिक विरोधी उमेदवार असताना देखील मताधिक्य दिले व खऱ्या अर्थाने युतीधर्म पाळला तसेच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात लोकसभा प्रभारी अतुलबाबा भोसले व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी जीवाचं रान करून कराड दक्षिण मध्ये भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात प्रथमच मताधिक्य मिळविले.त्यामध्ये आनंदरावनाना राजेंद्र यादव,जितेंद्र डुबल तसेच महायुतीचे पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते तथा पालकमंत्री सातारा जिल्हा
नामदार शंभूराज देसाई यांनी देखील निखराची लढाई लढली वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील अपेक्षेप्रमाणे बाक्या प्रसंगाला समोरेजात आ मकरंद आबा,मदनदादा भोसले सुरभिताई भोसले यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नामुळे आपण छान लढत दिली. परंतु कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विधानसभा प्रमुख मनोज दादा घोरपडे रामकृष्ण जी वेताळ, भीमराव काका, पाटील शंकर काका शेजवळ सचिन बेलागडे, राजेंद्र घाडगे, चित्रलेखाताई माने संपतराव मान वासुकाका माने,सचिन नलावडे आधी नेत्यांच्या निखराच्या प्रयत्नामुळे खऱ्या अर्थाने कराड उत्तर मध्ये अपेक्षेपेक्षा चांगली यश मिळाले.

 

सातारा लोकसभा मतदारसंघ सोडून माढ्याच्या उमेदवाराच्या प्रेमापोटी माढ्यातच मशगुल होता हे संपूर्ण कराड उत्तर च्या जनतेला ज्ञात असून याबाबतकोणता पुरावा देण्याचेआवश्यकता वाटत नाही.अशा परिस्थितीत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे भाजपा नेते नरेंद्र पाटील विक्रम पावस्कर,भरत नाना पाटिल,विक्रमबाबा पाटणकर आरपीआयचे अशोक बापू गायकवाड,युवराज कांबळे,आप्पास गायकवाड,एकनाथ रोकडे,मनसेचे धैर्यशील पाटील, युवराज पवार,ऍड विकास पवार,शेतकरी संघटनेचे नेते सचिन नलावडे राष्ट्रवादीचे शिवाजीराव महाडिक,अमित दादा कदम, आधी नेते मंडळींनी महायुतीचा धर्म पाळून ताकतीने काम केले. याउलट हे सर्व अलबेल आहे असा समज करून या निकालाचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी व सवयीप्रमाणे चमकोगिरी करण्यासाठी आपन चांडाळ चौकडी सोबत दिल्ली वारी केली असली तरी साताऱ्यातील जनता हे पेरलेलं पाप मुळासकट उपटून काढण्यास माहीर आहे,हे देखील आपणास ज्ञात असावे आणि हो माढ्याच्या पराभवाने “हानतुय संख्या,आन कुत्तुय तुक्या” या उक्तीप्रमाणे वैफल्यग्रस्त होऊन आपल्या तोंडून पक्षशिसतीला न शोभणारी अशी भाषा व वक्तव्य आपणाकडून होत आहे याची पक्षाकडे वरिष्ठ पातळीवरती नक्कीच दखल घेतली जाईल यात तीळमात्र शंका नाही कारण भारतीय जनता पार्टी ही तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कार्यकर्तृत्वावर उभी राहिलेली पार्टी असून या पक्षात चमकोगिरील थारा नाही हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे कारण आपणास उदयन राजेंचे मावळे काय आहेत हे निवडणूक पूर्वी तिकीट वाटपाच्या वेळी शासकीय विश्रामगहामध्ये सुनील तात्या काटकर योग्य वेळी उपस्थित झाले आणि अनर्थ टळला अन्यथा आपल्याला मावळे काय आहेत हे कळाले असते. कदाचित आपण करत असलेली ही वैफल्यग्रस्त बडबड करण्याचे धाडस आपण केले नसते. या सगळ्या गोष्टींचा आढावा घेता आपली स्थिती” बेगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना “अशी झाली असून.पुढच्या काळात आपणाकडून अशा गोष्टींची पुनरावृत्ती झाल्यास पक्षाच्या व्यासपीठावरच त्याचे आपणास उत्तर मिळेल याची नोंद घ्यावी.

 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्यासाठी उदयनराजेंनी खर्च केलेला शब्द विसरून दाखवलेली कृतज्ञता एकजबाबदार पदाधिकारी असताना पक्षाशी केलेली गद्दारी आहे.

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त