उरमोडी धरणातील अश्लीलतेचे कुरण नेमकं कोणाचं?

प्री-वेडिंग च्या नावाखाली लग्नाआधी नको ते घडतय ?

सातारा :- सातारा तालुक्यातील परळी खोर्यातील उरमोडी धरण क्षेत्र परिसर हा हिरवाई ने नटलेला परिसर असून पर्यटना साठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून उरमोडी धरण क्षेत्रात बेकायदेशीर प्री-वेडिंग स्पॉट तयार केला गेला असून. उरमोडी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या प्री-वेडिंग स्पॉट वर अश्लील प्रकार घडत असल्याचे चित्र पहायला मिळाते,यामुळे प्री-वेडिंग नंतर अनेक मुलींचा संसार उभा राहण्यापुर्वी मोडल्याच्या घटना ऐकिवात आल्या आहेत.

एवढेच नव्हे तर उरमोडी धरणात बोटींग ला परवानगी नसताना देखील याठिकाणी धरण क्षेत्रात बेकायदेशीर बोटींग केली जाते. एवढ्यावरच न थांबता संबंधित मात्र प्री-वेडिंग साठी आलेल्या कपलला बोटीच्या टोकांवर उभं करून जीव धोक्यात घालून फोटो शुट करताना दिसताहेत मात्र हे सर्व सुरू असताना देखील पाटबंधारे विभागाचे अधिकारी कारवाई करत नसल्याने पाटबंधारे विभागाचे अधिकारी नेमके कुठे काशीत कडवायला गेलेत ? असा सवाल जनमाणसातून उपस्थित केला जात आहे.

उरमोडी धरणाच्या परिसरात बेकायदेशीर पणे बोटींग तसेच धरण क्षेत्रात ड्रोनच्या माध्यमातून विनापरवाना व्हिडिओ शूटिंग केले जात असताना याठिकाणी पोलिस मात्र नेमकं काय करतायत असा प्रश्न उपस्थित होत आहे. याठिकाणी काही दिवसांपूर्वी दोन युवकांचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाला असताना देखील पोलिस याकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्याने उरमोडी धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त