विसावा नाक्यावरील ‘ग्रीन व्हिला’ या बंगल्यामधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 14.50 तोळ्यांचे दागिने आणि 1 लाख 25 हजारांची रोकड केली लंपास.

सातारा : सातारा येथील विसावा नाक्यावरील ‘ग्रीन व्हिला’ या बंगल्यामधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 14.50 तोळे वजनाची सोन्याची दोन बिस्किटे, 7.50 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच 1 लाख 25 हजारांची रोकड असा सुमारे 8 लाख 25 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.सातारा येथे दिवसेंदिवस घरफोडींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथील विसावा नाक्यावर डाॅ. सुषमा माने (वय 68) यांचा ग्रीन व्हिला या नावाचा बंगला आहे. दि. 13 रोजी सकाळी 8:45 ते रात्री 9 या वेळेत चोरट्याने माने यांच्या बंगल्यात दरवाजाचे लाॅक तोडून प्रवेश केला. यावेळी घरातील तब्बल 14.50 तोळ्यांचे दागिने आणि 1 लाख 25 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. रात्री उशिरा घरात चोरी झाल्याचे डाॅ. माने यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात याची तक्रार दिली.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या चोरीची पाहणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे हे करीत आहेत. दरम्यान, सातारा शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घरफोडी होत असल्याने चोरट्यांचा पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त