कृषी विभागाच्या इमारतीची झाली दुरवस्था चाफळ विभागातील शेतकऱ्यांना माहिती मिळणे कठीण; शेतकऱ्यांत नाराजी

 चाफळ : चाफळ विभागातील 60 ते 70 वाड्या वस्त्यांसाठी असलेल्या चाफळ येथील एकमेव कृषी विभागाच्या इमारतीची गेल्या अनेक वर्षापासून दूर अवस्था झाली आहे. असे असताना देखील याकडे पाटण तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे शेतकऱ्यांना कृषी अधिकारी सापडणे कठीण झाले आहे. त्यामुळे विभागातील शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
                  चाफळ परिसरातील 60 ते 70 वाढया वस्त्यावरील शेतकऱ्यांना शेती विषय व खरीप रब्बी, हंगामातील बी, बियाणे मिळावी या साठीचा फळे ते कृषी विभागाची चाफळ येथे इमारत बांधण्यात आली होती. या इमारतीत अनेक वर्षे कृषी विभागाचे अधिकारी आपल्या कुटुंबासह राहत होते. मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांपासून चाफळ येथील इमारती राहण्यासाठी धोकादायक झाल्याने या इमारतीत कोणीही राहत नसल्याने चाफळ विभागातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. शोध घेऊन देखील ते सापडत नाहीत एखाद्या वेळेस  कृषी विभागाचे अधिकारी चाफळ प्रभागात आले तर ते ठराविक शेतकऱ्यांनाच भेटून जातात. त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
                    चाफळ येथील मोडकळीस आलेल्या कृषी विभागाच्या इमारतीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणे गरजेचे बनले आहे. सध्या इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरवस्ता झाली आहे. स्लॅबला गळती  लागल्याने इमारतीत पाणी साचून राहत आहे. भिंतीला चारी बाजूने भेगा पडलेल्या असून इमारतीतील संपूर्ण फरशी उघडली आहे. त्यामुळे इमारतीमध्ये सरपटणाऱ्या विविध प्राण्यांचा वावर वाढला आहे.
                    इमारतीच्या आजूबाजूला झाडे झुडपे वाढली आहे. इमारतीत लाकडे ठेवण्यात आली आहे. इमारतीच्या चारही बाजूला मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने आजूबाजूच्या लोकांना याचा लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सर्व बाजूला असलेल्या खिडक्यांनी कडून पडल्या आहेत. शौचालयाचे देखील दुरावस्था झाली आहे. त्यामुळे इमारतीच्या आजूबाजूला उघड्यावर शौचालयात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तरी चाफळ येथील कृषी विभागाच्या इमारतीसाठी लोकप्रतिनिधीनी भरीव निधी देऊन इमारत बांधावी अशी मागणीचा चाफळसह भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त